घटक (Unit-1): भाषा, भाषा आविष्काराची रूपे आणि भाषाविज्ञान
● (अ) भाषा आविष्काराची रूपे :
भाषेची ओळख, भाषिक व्यवहाराचे स्वरूप, आविष्करणाचे प्रकार, (मौखिक व लिखित), भाषा आणि दृक-श्राव्य कला, भाषा आणि सादरीकरणाची कला, साहित्याचे माध्यम म्हणून भाषेचे कार्य, साहित्याच्या भाषेची वैशिष्ट्ये, भाषा आणि कथन.
● (ब) व्याकरण:
शब्दाच्या जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद विचार, समास, अलंकार, वृत्ते इत्यादी.
● (क) भाषाविज्ञान:
भाषेची उत्पत्ती व उपपत्ती, भाषाकुल संकल्पना, स्वन, स्वनीम, स्वनांतर, पद, पदिम, पदांतर, वाक्यविचार, अर्थविचार, भाषाविज्ञानाच्या विविध अभ्यास पद्धती, मराठीचे लेखनविषयक नियम.
समाजभाषाविज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती, समाजभाषाविज्ञान आणि इतर अभ्यासशाखा, तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान, संदेशनाची माध्यमे, तंत्रज्ञानाने प्रभावित होणारे संदेशनाचे घटक, मराठी भाषा व तंत्रज्ञान आणि नवभाषा निर्मिती. भाषा व बोली (अहिराणी, कोकणी, मालवणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, चंदगडी, भिलाऊ, झाडी, वऱ्हाडी, घाटी, भिल्ली, डांगी, दखनी इत्यादी), भाषा व बोली यांचे समाजातील स्थान व सहसंबंध बोलीचे स्वरूप व वैशिष्ट्ये, बोलींची निर्मिती, बोलींमधील परिवर्तनाची प्रक्रिया व सीमा आणि इतर बोलींचा प्रभाव. बोली अभ्यासाचे महत्त्व, बोली संरचना विचार, बोली अभ्यास, समाजभाषावैज्ञानिक दृष्टीकोन, बोलींसमोरील आव्हाने.
घटक (Unit-2): संस्कृती संकल्पना आणि वाङ्मयनिर्मिती
● वाङ्मयीन संस्कृतीचे पारंपरिक घटक, मौखिक परंपरा, हस्तलिखिते, कथन, पठण, श्रवण, सादरीकरण (तमाशा, लळीत, भारुड, बोहाडा, निरुपण, कीर्तन, प्रेक्षक, श्रोता, कथनकार) वाक्य, धर्म, पंथ आणि राजाश्रयाचा सहसंबंध.
● वाङ्मयीन संस्कृतीचे आधुनिक घटक: मुद्रिते, मुद्रक, नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तके, संपादक, लेखक, प्रकाशक, वाचक, समीक्षक, वितरक, वाङ्मयीन संस्था, महामंडळे, संमेलने, पुरस्कार.
● नागर आणि ग्रामीण अभिरुची, लेखक व वाचक यांच्यातील आदान प्रदान, वाङ्मयीन संस्कृती संघर्ष (अभिजन - बहुजन), भाषाशुद्धी व वाक्यशुद्धीबद्दलच्या संकल्पना, श्लील अश्लील संबंधीचे वाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व निर्बंध.
● सामाजिक प्रबोधनात वाङ्मयीन संस्कृतीचे योगदान, (सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे, मेळे इत्यादी), संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आविष्कार, वैचारिक, प्रबोधन- उदबोधन, निबंध वाङ्मय, प्रायोगिक नाटक व पथनाट्ये इत्यादी.
● मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा नकाशा, साहित्यसंमेलनातील परिवर्तने, वादविवाद, भूमिका, वाक्यबाह्य घटकांची वाङ्मयीन संस्कृतीवरील आक्रमणे, वाङ्मयीन संस्कृतीतील लेखकाची प्रतिमा, मराठी समाजमानस आणि ग्रंथव्यवहाराचा प्रभाव.
घटक (Unit-3): भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा:
● भारतीय साहित्याची संकल्पना, आंतरभाषीय भाषा-भगिनीभाव संकल्पना, भाषांतराची संकल्पना, भाषांतर- अनुवाद आणि रुपांतर, आंतरभारतीय साहित्याचे मराठीतील भाषांतर, भाषांतरातील समस्या, प्रभाव अभ्यासाची संकल्पना, प्रभव, प्रभाव आणि अनुकरण, प्रभावाची कारण मीमांसा, प्रभाव आणि सत्तासंबंध, प्रभाव आणि निर्मितीप्रेरणा (तत्त्व-वैचारिक प्रवाहांच्या प्रेरणा), सामाजिक, राजकीय घटीतांमधून प्रेरणा, व्यक्तीच्या प्रभावातून प्रेरणा.
● रचनाप्रकारांचा प्रभावानुरोधाने अभ्यास ( सुनीत, कादंबरी, गझल, हायकू), अभंगाचा आधुनिक कवितेवर प्रभाव, पाश्चात्य नाट्यप्रवाहांचा व लोककलांचा मराठी रंगभूमीवरील प्रभाव.
घटक (Unit-4): लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह
● लोकसाहित्य: संकल्पना, स्वरूप व व्याप्ती.
● लोकसाहित्यातील लोकतत्वे, लोकभाषा, धार्मिकता आणि इहवाद, लोकसाहित्यातील संप्रदाय, लोकसाहित्यातील लोकप्रयोज्य कला व संशोधन.
● दलित साहित्य: स्वरूप, प्रेरणा व तत्वज्ञान.
● दलित साहित्याचा इतिहास: (कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य इत्यादी)
● ग्रामीण साहित्य: स्वरूप व प्रेरणा
● ग्रामीण साहित्याचा इतिहास : (कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य इत्यादी)
घटक (Unit-5): वाङ्मयेतिहासाचा अभ्यास
● वाङ्मयेतिहासाची संकल्पना, वाङ्मयेतिहास लेखनाचे नवे दृष्टिकोन, विविध राजवटी आणि वाङ्मय इतिहास लेखन, वाङ्मय इतिहास आणि इतर इतिहास लेखन पद्धती, वाङ्मय इतिहास (आरंभ ते २०१५)
घटक (Unit-6): वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप:
● मराठीतील वाङ्मयीन चळवळी, चळवळीचे समाजशास्त्र, भक्तीसाहित्याची चळवळ, भाषाशुद्धीची चळवळ, वाङ्मयशुद्धीची चळवळ, अनियतकालिकांची चळवळ, दलित साहित्याची चळवळ, ग्रामीण साहित्याची चळवळ, आदिवासी साहित्याची चळवळ, स्त्रीमुक्तीची चळवळ, शेतकरी चळवळ, चळवळीच्या प्रभावतील मराठी साहित्य, वाङ्मयीन अभिरुची (रुची अभिरुची), अभिरुची संपर्क, अभिरुची संघर्ष, मुद्रणपूर्व अभिरुचीचे स्वरूप, आंग्लसंपर्कानंतरची अभिरुची आणि संघर्ष, सामाजिक संस्था, सत्ता, जातिसंघर्ष आणि अभिरुची.
घटक (Unit-7): साहित्य प्रवाह
● साहित्यप्रवाहाचे स्वरूप, व्याप्ती व मर्यादा. साहित्यप्रवाहाच्या निर्मिती प्रेरणा, आधुनिक साहित्य, नवसाहित्य, महानगरीय साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जैन साहित्य, ख्रिस्ती साहित्य, मुस्लिम साहित्य, जनवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, विज्ञान साहित्य, अल्पसंख्यकांचे साहित्य, बालसाहित्य, कामगारांचे साहित्य इत्यादी.
घटक (Unit-8): साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय
● (अ) काव्यशास्त्र, काव्यलक्षण, प्रयोजन, प्रतिभाविचार, शब्दशक्ती, रीतिविचार, ध्वनिविचार, आनंद मीमांसा.
● (ब) महानुभाव, नाथ, वारकरी, दत्त, रामदास, वीरशैव, सुफी संप्रदाय आणि त्यांचे साहित्य. पंडिती परंपरा, बखर वाङ्मय, शाहिरी वाङ्मय.
घटक (Unit-9): साहित्यप्रकारांचा सूक्ष्म विचार
● साहित्यप्रकाराची संकल्पना, पौर्वात्य व पाश्चात्य, महाकाव्य, आख्यानकाव्य, खंडकाव्य, कविता, दीर्घ कविता, भावकविता (अभंग, ओवी, लावणी, पोवाडा)
● लघुकथा, कथा, दीर्घकथा, लघुकादंबरी, कादंबरी, नाटक, एकांकिका, पथनाट्य, रिंगणनाट्य, महानाट्य,
● चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथा, आत्मकथन-स्वकथन, आठवणी, रोजनिशी, प्रवासवर्णन, निबंध आणि वैचारिक निबंध, ललितनिबंध, व्यक्तीचित्र.
● समीक्षा व समीक्षा पद्धती.
घटक (Unit-10): निवडक साहित्यकृती
● लीळाचरित्र: एकांक (शं. गो. तुळपुळे), तुकारामाची गाथा, एकनाथांची भारुडे, जनाबाईचे निवडक अभंग, मराठी गौळणी, आज्ञापत्रे, सभासद बखर, शिवाजीचा पवाडा (महात्मा फुले) स्मृतिचित्रे (लक्ष्मीबाई टिळक) बनगरवाडी ( व्यंकटेश माडगूळकर), आनंद ओवरी (दि. बा. मोकाशी), तुही यत्ता कंची (नामदेव ढसाळ) जिणं आमचं (बेबी कांबळे), गिधाडे (विजय तेंडुलकर), शोभायात्रा (शफात खान), भिजकी वही (अरुण कोलटकर), हिंदू: जगण्याची समृध्द अडगळ (भालचंद्र नेमाडे), कोण नाही कोन्चा, वरणभात लोन्चा (जयंत पवार), पायी चालणार (प्रफुल्ल शिलेदार), आयदान (उर्मिला पवार), वळीव (शंकर पाटील), माणूस (मनोहर तल्हार), जेव्हा मी जात चोरली होती (बाबुराव बागुल), कोण म्हणतंय टक्का दिला (संजय पवार)