2016 MH-SET Paper 1 solved paper

Adx
set paper 1 books in marathi pdf free download, set english syllabus, set syllabus for english, set exam syllabus english literature, set paper 1 study material pdf in marathi, set life science syllabus, सेट परीक्षा प्रश्नपत्रिका, set commerce syllabus, set exam mathematics syllabus pdf, set paper 1 books pdf free download, english set exam syllabus, library science question papers with answers pdf, set exam library science question papers with answers pdf, mh set paper 1 book pdf, set paper 1, set sociology syllabus, set syllabus life science, set computer science syllabus, set mathematics syllabus, set sanskrit question paper, set economics syllabus, library science set exam question paper in marathi, social work set exam question papers, set life science syllabus pdf, set paper 1 syllabus in marathi, set physics syllabus, set exam paper 1 books pdf, set syllabus for chemistry, set exam syllabus for physics pdf, set exam syllabus for computer science, set political science syllabus, set psychology syllabus, set exam syllabus for chemistry pdf,

#7



Q.1. Application of course-content in day-to-day life is mainly achieved through : 

(A) Demonstration method

(B) Project method

(C) Field visit

(D) Inquiry method

Q.1. पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त आहे.

(A) दिग्दर्शन पद्धत

(B) प्रकल्प पद्धत

(C) क्षेत्र भेट पद्धत

(D) पृच्छा पद्धत



Q.2. In order to monitor students' progress and to modify teaching accordingly, the best method of evaluation is :

(A) formative evaluation

(B) summative evaluation

(C) qualitative evaluation.

(D) objective-based evaluation

Q.2. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी …………. ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे.

(A) आकारिक मूल्यमापन

(B) साकारिक मूल्यमापन

(C) गुणात्मक मूल्यमापन

(D) उद्दिष्टाधारित मूल्यमापन



Q.3.The question, "How would you prove that the earth is round or not round ?" is based on the …………..  objective.

(A) Comprehension

(B) Evaluation

(C) Application

(D) Synthesis

Q.3. “पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल ?" हा प्रश्न …………. या उद्दिष्टावर आधारित आहे.

(A) आकलन

(B) मूल्यमापन

(C) उपयोजन

(D) संश्लेषण



Q.4. Which of the following is not essential for good teaching?

(A) Human-relations skills

(B) Communication skills

(C) Attractive personality

(D) Knowledge of appropriate teaching methods.

Q.4. खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही ?

(A) मानवी संबंध विषयक कौशल्ये

(B) संप्रेषण कौशल्ये

(C) आकर्षक व्यक्तिमत्त्व

(D) योग्य अध्यापन पद्धतींचे ज्ञान



Q.5. The most important purpose of 'guidance' of students is to :

(A) help them to understand their own shortcomings

(B) help them to change their faulty behaviour

(C) make them capable of helping themselves

(D) direct them about the right path

Q.5.विद्याथ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश ………… हा आहे..

(A) स्वत:च्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे

(B) त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे

(C) त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनविणे

(D) त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणे



Q.6. The best method of increasing the motivation to learn is:

(A) punishing inattention during learning

(B) asking difficult questions while teaching

(C) explaining, in the beginning, the purpose of teaching a unit

(D) using a variety of audio-visual aids

Q.6. अध्ययन-अभिप्रेरण वाढविण्याची ………. ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे.

(A) अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे

(B) अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे

(C) घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे

(D) विविध दृक्-श्राव्य साधनांचा वापर करणे



Q.7. A research problem is primarily chosen depending upon :

(A) its relevance

(B) available funds

(C) interest of the researcher

(D) availability of literature

Q.7. संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने …………. अवलंबून असते.'

(A) त्याच्या समर्पकतेवर

(B) उपलब्ध निधीवर

(C) संशोधकाच्या आवडीवर

(D) ग्रंथसंपदेच्या उपलब्धतेवर



Q.8. Which of the following is a primary source of information ?

(A) A research review

(B) A recently written text-book

(C) A research article published in a standard journal

(D) A multi-author treatise published in the year 2015

Q.8. खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे ?

(A) संशोधनांचा समालोचक अहवाल

(B) नुकतेच लिहिलेले पाठ्य-पुस्तक

(C) प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख

(D) अनेक लेखकांनी लिहिलेला व 2015 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ



Q.9. A research report showed that the population of a country increased from 20 million in 1941 A.D. to 60 million in 2000 A.D. The study can best be described as …………

(A) Factorial

(B) Social

(C) Longitudinal

(D) Cross-sectional

Q.9. एका संशोधन अहवालानुसार, एका देशाची लोकसंख्या 1941 यासाली दोन कोटी होती, ती 2000 साली सहा कोटी इतकी झाली. या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन ………… असे होईल.

(A) घटकीय

(B) सामाजिक

(C) दीर्घकालीन

(D) छेद-खंडित



Q.10. A hypothesis is not always necessary in ……….. studies.

(A) normative

(B) correlational

(C) experimental

(D) historical

Q.10. ………… अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाही.

(A) प्रमाणीभूत

(B) सहसंबंधात्मक

(C) प्रयोगाधिष्ठित

(D) ऐतिहासिक



Q.11. Which of the following sampling methods is based on probability?

(A) Judgement sampling

(B) Stratified sampling

(C) Quota sampling

(D) Convenience sampling

Q.11. खालील नमुना निवड पद्धतींपैकी कोणती पद्धत "संभाव्यते" वर आधारित आहे ?

(A) निकषाधारित नमुना निवड

(B) स्तरीय नमुना निवड

(C) प्रमाण नमुना निवड

(D) सुगम्य नमुना निवड



Q.12. Field study is concerned with :

(A) real life situations

(B) doing laboratory studies in the outdoors

(C) experimental approach.

(D) collecting selective data

Q.12. क्षेत्रीय अभ्यासाशी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडित आहे ?

(A) प्रत्यक्ष वस्तुस्थिती

(B) प्रयोगशाळेतील परंतू बाहेर केलेला अभ्यास

(C) प्रायोगिक दृष्टिकोन

(D) निवडक माहिती संग्रहण



Answer question Nos. 13 to 18 based on either the English passage or the Marathi passage:

When a person claims to be non- violent, he is expected not to be angry with one who has injured him. He will not wish him harm; he will wish him well; he will not swear at him; he will not cause him any physical hurt. He will put up with all the injury to which he is sub- jected by the wrong-doer. Thus non- violence is complete innocence. Complete non-violence is complete absence of ill-will against all that lives. It therefore embraces even sub-human life, not excluding noxious insects or beasts. They have not been created to feed our destructive pro- pensities. If we only knew the mind of the Creator, we should find their proper place in His creation. Non- violence is therefore in its active form goodwill towards all life. It is pure Love.

Non-violence is a perfect state. It is a goal towards which all mankind moves naturally though uncon- sciously. Man does not become divine when he personifies inno- cence in himself. Only then does he become truly man. In our present state, we are partly men and partly beasts and in our ignorance and even arrogance say that we truly fulfil the purpose of our species, when we deliver blow for blow and develop the measure of anger required for the purpose.

Q.13. A truly non-violent person would not even :

(A) take revenge upon his enemy

(B) have ill will for his enemy

(C) cause his enemy some injury

(D) destroy his enemy


Q.14. The idea of non-violence concerns

(A) progressive societies

(B) insects and animals.

(C) God

(D) all forms of life.


Q.15. Which of the following statements is true ?

(A) Complete non-violence is the absence of will power

(B) Non-violence is pure love for all whom we know

(C) All living beings have their proper place in the universe

(D) A non-violent person is always passive


Q.16. At present, man is partly ……….. in his behaviour and attitude.

(A) beastly

(B) divine

(C) cowardly

(D) ignorant


Q.17. Non-violence is pure :

(A) Perfection

(B) Love

(C) Generosity

(D) Consciousness


Q.18. The most appropriate title for the passage is :

(A) The advantages of non-violence

(B) It is really possible to be non-violent

(C) Non-violence as a political ideology

(D) The spirit of non-violence



प्रश्न क्र. 13 ते 18 हे पुढे दिलेल्या उताऱ्यावर आधारित आहेत. इंग्रजीतील किंवा मराठीतील उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या :

गांधीजी स्त्रीपुरुषांमधील स्पर्धा अमान्य करतात. स्त्रियांनी उत्तम शिक्षण घ्यावे, परंतु त्याचा जास्तीत जास्त उपयोग 'घरासाठी' करावा. पुरुषाचे कार्यक्षेत्र 'घराबाहेर' आहे. त्यामुळे त्याला अधिक ज्ञानाची आणि शिक्षणाची गरज आहे. स्त्रीलाही अधिक ज्ञानाची गरज आहे, पण या ज्ञानाचे क्षेत्र 'कौटुंबिक' आहे. मुलांचे शिक्षण आणि संगोपन हे अत्यंत महत्त्वाचे कार्य स्त्रियांकडे आहे : आजच्या काळात 'घराबाहेर' सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया जबाबदाऱ्या सांभाळताना दिसतात. पण हे केवळ मोठ्या शहरांमध्ये. गांधीजींना हे परिवर्तन रुचले असते का, असा एक काल्पनिक प्रश्नही विचारता येईल. गांधीजींचा वैचारिक पोत पाहता त्यांना हे रुचले नसते, असा निष्कर्ष काढता येण्यासारखा आहे. लोकशाहीच्या युगात राहूनही लोकशाहीतील आणि संसदेसारख्या संस्थेतील अनेकविध दोष त्यांना जाणवले व त्यांनी उघडपणे आणि त्यांच्या ‘तार्किक' पद्धतीने त्यांना वाट करून दिली व काही पर्यायदेखील सुचविले. तीच बाब यंत्रयुगाचीही आहे. यंत्रयुगात राहून यंत्रसंस्कृतीतील दोष उघडपणे मांडण्याचे धारिष्ट्य गांधीजींनी दाखविले होते. गांधीजी स्त्रीपुरुषांमध्ये समानता (equality) असावी असा आग्रह धरत असले, तरी ते स्त्रीपुरुषांना एकसारखे (identical) मानत नाहीत. म्हणून त्यांना दिले जाणारे शिक्षण काही बाबतीत 'वेगळे' असले पाहिजे. स्त्रियांनी पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू नये. अर्थात् गांधीजींनी पुरुषांनादेखील हाच सल्ला दिला होता. स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे सर्व भारतीयांच्या शिक्षणास पूरकता यायला हवी. जर स्त्रिया आणि त्यांच्या अपत्यांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधून त्यांच्या कार्यात सहकार्य केले तर ग्रामीण भागात शांततापूर्ण क्रांती होईल.


Q.13. गांधीजी स्त्रीपुरुषांमधील स्पर्धा अमान्य करतात, कारण :

(A) स्त्रियांच्या ठिकाणी ज्ञान नसते

(B) विषम कार्यक्षेत्र

(C) स्त्रियांना उत्तम शिक्षणाची आवश्यकता आहे

(D) पुरुषांना अधिक ज्ञानाची गरज आहे


Q.14. मुलांचे शिक्षण आणि संगोपन हे अत्यंत महत्त्वाचे कार्य स्त्रियांकडे आहे, कारण ………

(A) तिला ज्ञानाची आवश्यकता नाही

(B) तिचे मुलांवर अधिक प्रेम असते

(C) तिला शिक्षणाचे अंग असते

(D) घर हे तिचे कार्यक्षेत्र आहे


Q.15. गांधीजींना आधुनिक कालखंडातील स्त्रीपुरुष समानता न रुचण्याचे कारण म्हणजे :

(A) गांधीजींची अपरिपक्वता

(B) गांधीजींची परिवर्तनशील भूमिका

(C) गांधीजींचा वैचारिक दृष्टिकोण

(D) गांधीजींना पटलेले स्त्रियांचे महत्त्व


Q.16. गांधीजींनी यंत्रसंस्कृती स्वीकारली हे खरे असले, तरी यंत्रसंस्कृतीतील दोषही त्यांनीच दाखविले.

(A) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(C) संपूर्ण विधान चूक

(D) संपूर्ण विधान बरोबर


Q.17. ग्रामीण जीवनात परिवर्तनाची गरज आहे, परंतु त्यासाठी पाश्चात्य संस्कृतीपासून लांब राहण्याची आवश्यकता आहे.

(A) संपूर्ण विधान चूक

(B) संपूर्ण विधान बरोबर

(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(D) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर


Q.18. या उता-यासाठी अधिक समर्पक शीर्षक कोणते ?

(A) पाश्चात्य संस्कृती

(B) स्त्रियांचे श्रेष्ठत्व

(C) स्त्रीपुरुष समानता

(D) स्त्रीपुरुष विषमता



Q.19. In the context of face to face interpersonal communication which of the following is an incorrect statement ?

(A) Verbal signs or signals are more in terms of quantum and variety

(B) Non-verbal signs or signals are difficult to control

(C) In case of confusion over meaning, verbal signs are trusted less

(D) Non-verbal signs or signals are mostly involuntary

Q.19. दोन व्यक्तींमधील समोरासमोरील संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

(A) शब्दरूप चिन्हे वा खुणांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते

(B) नि:शब्द चिन्हे वा खुणांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते

(C) नेमक्या अर्थाविषयी गोंधळ निर्माण झाल्यास शब्दरूप चिन्हांवर कमी विश्वास ठेवला जातो

(D) नि:शब्द चिन्हे वा खुणा बहुधा स्वयंस्फूर्त असतात



Q.20. In which of the following types of communication the potential for getting quick, significant and reliable feedback is maximum ?

(A) Mass Communication

(B) Group Communication

(C) Interpersonal Communication

(D) Inter-group Communication

Q.20. खालीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान, लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद / प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते ?

(A) जन संज्ञापन

(B) गट संज्ञापन

(C) दोन व्यक्तींमधील संज्ञापन (संवाद)

(D) दोन गटांमधील संज्ञापन



Q.21. Identify the incorrect pair of media and its performance indicator from the following :

(A) Newspapers – Circulation

(B) Cinema – Box Office

(C) Television – TVT

(D) Radio – ROD

Q.21. प्रसारमाध्यमे व बाजारपेठेतील त्यांच्या कामगिरीचा निर्देशक यांची खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे ?

(A) वृत्तपत्रे – वितरण (सर्क्युलेशन)

(B) चित्रपट – बॉक्स ऑफिस

(C) दूरचित्रवाणी – टीव्हीटी

(D) रेडिओ – आरओडी



Q.22. In the context of FM Radio the abbreviation FM stands for :

(A) Frequency Manipulation

(B) Frequency Modulation

(C) Fidelity Modifier

(D) Fidelity Modulation

Q.22. एफएम रेडिओच्या संदर्भात 'एफएम' या लघुरूपाचा विस्तार काय ?

(A) फ्रिक्वेन्सी मॅनिप्युलेशन

(B) फ्रिक्वेन्सी मॉड्यूलेशन

(C) फायडॅलिटी मॉडिफायर

(D) फायर्डीलिटी मॉड्यूलेशन



Q.23. The sitting arrangement in a typical classroom in which students, face the teacher, encourages a communication which :

(A) facilitates easy interaction among students

(B) give more communicative power to teacher for control

(C) give equal communicative power to teacher and students

(D) facilitates a multidirectional conversation

Q.23. एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेली असतात. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते ?

(A) विद्यार्थ्यांचे एकमेकांमधील संभाषण वाढते व सोपे होते

(B) शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो

(C) शिक्षक व विद्यार्थ्यांना संज्ञापनाबाबत समान अधिकार मिळतात

(D) बहुदिश संभाषणाला चालना मिळते.



Q.24. For a teacher what is the easiest and quickest location of getting the students' feedback in a classroom situation ?

(A) Body language of students

(B) Questions asked by students

(C) The quality of class notes taken by them

(D) Assignment submitted by them on the topic

Q.24. एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकविण्याच्या संदर्भात प्रतिसाद वा प्रत्याभरण मिळण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते ?

(A) विद्यार्थ्यांची देहबोली

(B) विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न

(C) विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदीचा दर्जा

(D) विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वाध्याय



Q.25. For the sequence, 1/2, 2/3, 3/4, ……..n/n + 1, ……….  which of the following is not true ? 

(A) The sequence is strictly increasing

(B) The sequence is bounded above by 0.99

(C) The sequence is bounded below and bounded above

(D) The sequence contains no number between 3/4 and ⅘

Q.25. 1/2, 2/3, 3/4, ……..n/n + 1, ………. या संख्यामालेसाठी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

(A) ही संख्यामाला क्रमशः वाढत जाणारी आहे

(B) या संख्यामालेतील प्रत्येक संख्या 0.99 पेक्षा मोठी नाही

(C) या संख्यामालेतील प्रत्येक संख्येपेक्षा लहान असणारी एक संख्या आहे व यातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असणारी एक संख्या आहे

(D) या संख्यामालेतील कोणतीही संख्या 3/4 व 4/5 मध्ये नाही.



Q.26. Which of the following is not a linguistic skill ?
(A) Speaking
(B) Reading
(C) Thinking
(D) Writing
Q.26. खालीलपैकी कोणते भाषाविषयक कौशल्य नाही ?
(A) वक्तृत्व
(B) वाचन करणे
(C) विचार करणे
(D) लेखन करणे


Q.27. Suppose that X is a set of some real numbers. From which of the following statements does not deduce the other statements?
(A) Between any two numbers in X, there is at least one number in X.
(B) Between any two numbers in X, there are at least two numbers in X.
(C) Between any two numbers in X, there are infinitely many numbers in X.
(D) If X contains at least two numbers then X contains infinitely many numbers.
Q.27. समजा X हा काही वास्तव संख्यांचा संच आहे. खालीलपैकी कोणत्या विधानावरून इतर विधानांची सिद्धता देता येत नाही ?
(A) X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये, एकतरी संख्या X मध्ये आहे.
(B) X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये, X मधील कमीतकमी दोन संख्या असतात.
(C) X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये, X मधील अनंत संख्या असतात.
(D) X या संचात कमीतकमी दोन संख्या असल्यास, X मध्ये अनंत संख्या असतात.


Q.28. There are 7 persons in a party. The number of hands shaken all together in the party counted with multiplicity, cannot be :
(A) 5
(B) 6
(C) 10
(D) 2
Q.28. एका पार्टीत 7 व्यक्ती आहेत. या पार्टीमध्ये हस्तांदोलनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या (वारंवारतेनुसार मोजल्यास) खालीलपैकी कोणती असू शकत नाही ?
(A) 5
(B) 6
(C) 10
(D) 2


Q.29. If two distinct circles in a plane are intersecting each other, then they intersect in :
(A) exactly one point
(B) infinitely many points
(C) at the most two points
(D) exactly two points
29. प्रतलातील दोन वर्तुळे एकमेकांना छेदत असल्यास :
(A) एकच छेदन बिंदू असतो
(B) अनंत छेदन बिंदू असतात
(C) जास्तीत जास्त दोन छेदन बिंदू असतात
(D) दोन आणि दोनच छेदन बिंदू असतात


Q.30. If the word PRINCE is coded as 151781324 in a code language, then what should be the code for the word KING in the same language?
(A) 108136
(B) 119135
(C) 109145
(D) 118146
Q.30. एका सांकेतिक भाषेत PRINCE या शब्दाचा संकेत 151781324 असा आहे. तर त्याच भाषेत KING या शब्दाचा संकेतांक काय असेल ?
(A) 108136
(B) 119135
(C) 109145
(D) 118146


Q.31. Based on the following statements which of the conclusion's given below will follow/s ?
Statement I: All the bowlers of my team are wicket takers.
Statement II: Varun is not a wicket taking bowler.
Conclusion 1 : Varun is a spin bowler.
Conclusion 2 : Varun is not a bowler of my team.
(A) Only 1
(B) Only 2
(C) Both 1 and 2
(D) Neither 1 nor 2
Q.31. पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणता (ते) निष्कर्ष काढता येतात ?
विधान I माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत.
विधान II वरुण हा विकेट घेणारा गोलंदाज नाही.
निष्कर्ष 1 : वरुण फिरकी गोलंदाज आहे.
निष्कर्ष 2: वरुण माझ्या संघातील गोलंदाज नाही.
(A) फक्त 1
(B) फक्त 2
(C) 1 व 2 दोन्हीही
(D) 1 व 2 दोन्हीही नाही


Q.32. Based on the following statements, which of the conclusion/s will follow/s ?
Statement I: All apples are mangoes.
Statement II: All mangoes are bananas.
Conclusion 1 : All apples are bananas.
Conclusion 2: Some bananas are mangoes.
(A) Only 1
(B) Only 2
(C) Both 1 and 2
(D) Neither 1 nor 2
Q.32. पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणता (ते) निष्कर्ष काढता येतात ?
विधान I : सर्व सफरचंद आंबे आहेत.
विधान II : सर्व आंबे केळी आहेत.
निष्कर्ष 1 : सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष 2 : काही केळी आंबे आहेत.
(A) फक्त 1
(B) फक्त 2
(C) 1 व 2 दोन्हीही
(D) 1 व 2 दोन्हीही नाही


Q.33. If the word FROG is coded as 719168, then what should be the code for TRIP?
(A) 21181016
(B) 21191017
(C) 2019917
(D) 2119916
Q.33. एका सांकेतिक भाषेत जर FROG हा शब्द 719168 असा लिहिला, तर त्याच भाषेत TRIP या शब्दाचा संकेतांक काय ?
(A) 21181016
(B) 21191017
(C) 2019917
(D) 2119916


Q.34. Which one is the odd-one out from the following ?
(A) FEG
(B) TSU
(C) NML
(D) ROS
Q.34. खालीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे ?
(A) FEG
(B) TSU
(C) NML
(D) RQS


Q.35. Five players, P, Q, R, S and T are playing cards on a table facing the center. P is on the left of Q but not a neighbour of T. S is on the right of R and is not a neighbour of Q. T is on the right of Q. Who is on the right of S ?
(A) R
(B) P
(C) T
(D) Q
Q.35. पाच खेळाडू, P Q R S आणि T एका टेबलाभोवती पत्ते खेळत आहेत. P हा Q च्या डाव्या बाजूस बसला आहे, परंतू तो T चा शेजारी नाही. S हा Rच्या उजव्या बाजूला बसला असून तो Qचा शेजारी नाही. T हा Qच्या उजव्या बाजूस बसला आहे. तर Sच्या उजव्या बाजूस कोण आहे ?
(A) R
(B) P
(C) T
(D) Q


Q.36. Which of the alternatives will complete the following letter series ?
EGF, IKJ,........ QSR, UWV.
(A) MON
(B) LNM
(C) NPO
(D) MNO
36. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल ?
EGF, IKJ,........ QSR, UWV.
(A) MON
(B) LNM
(C) NPO
(D) MNO


Use the following table to answer questions 37 to 40 : 
Distribution of students at graduate and post-graduate levels in seven institutes is given below :
प्रश्न क्र. 37 ते 40 साठी खालील तक्त्याचा उपयोग करावा :
सात संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे वितरण खालील तक्त्यात दिली आहे :

Q.37. Total number of students studying at post-graduate level in institutes N and O is :
(A) 5601
(B) 5944
(C) 6669
(D) 7004
Q.37. N आणि O या संस्थांमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे ?
(A) 5601
(B) 5944
(C) 6669
(D) 7004



Q.38. What is the total number of graduate and post-graduate students in institute Q?

(A) 8320

(B) 7916

(C) 9116

(D) 8372

Q.38. Q या संस्थेमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे ?

(A) 8320

(B) 7916

(C) 9116

(D) 8372



Q.39. What is the ratio between the number of students studying at post-graduate and graduate levels respectively from institute R ?

(A) 14 19

(B) 19: 21

(C) 17: 21

(D) 19: 14

Q.39. R या संस्थेतील पदव्युत्तर विद्यार्थी आणि पदवी विद्यार्थी यांच्या संख्यांचे गुणोत्तर काय आहे ?

(A) 14 19

(B) 19: 21

(C) 17: 21

(D) 19: 14



Q.40. What is the ratio between the number of students studying at post- graduate level from institute R and the number of students studying at graduate level from institute P ?

(A) 13: 19

(B) 21: 13

(C) 13: 8

(D) 19: 13

Q.40. R या संस्थेतील पदव्युत्तर विद्यार्थी आणि P या संस्थेतील पदवी विद्यार्थी यांच्या संख्यांमधील गुणोत्तर काय आहे ?

(A) 13: 19

(B) 21: 13

(C) 13: 8

(D) 19: 13




Q.41. If the total area under jowar is 1.5 million acres, what is the area under rice ?

(A) 6 million acres

(B) 7.5 million acres

(C) 9 million acres

(D) 4.5 million acres

Q.41. ज्वारीखालील क्षेत्र जर 15 लक्ष एकर असेल तर तांदुळा खालील क्षेत्र किती असेल ?

(A) 60 लक्ष एकर

(B) 75 लक्ष एकर

(C) 90 लक्ष एकर

(D) 45 लक्ष एकर



Q.42. If the production of wheat is 6 times that of barley, what is the ratio between the yield per acre of wheat and barley ?

(A) 3 : 2

(B) 3 : 1

(C) 12 : 1

(D) 2 : 3

Q.42. गव्हाचे उत्पादन बार्लीच्या उत्पादनाच्या सहापट असेल, तर गहू आणि बार्ली यांच्या प्रति एकरी उत्पादनांमधील गुणोत्तर काय असेल ?

(A) 3 : 2

(B) 3 : 1

(C) 12 : 1

(D) 2 : 3



Q.43. Which of the following is the correct chronology of internet based/ facilities ?

(A) Google, Hotmail, Facebook, Whatsapp

(B) Facebook, Google, Hotmail, Whatsapp

(C) Hotmail, Google, Facebook, Whatsapp

(D) Hotmail, Facebook, Google, Whatsapp

Q.43. इंटरनेट आधारीत खालील सेवांचा योग्य कालानुक्रम कोणता ?

(A) गुगल, हॉटमेल, फेसबुक, व्हॉटस्अॅप

(B) फेसबुक, गुगल, हॉटमेल, व्हॉटस्अॅप

(C) हॉटमेल, गुगल, फेसबुक, व्हॉटस्अॅप

(D) हॉटमेल, फेसबुक, गुगल, व्हॉटस्अॅप



Q.44. Identify the odd element from the following on the basis of its basic function :

Windows, Android, MS-Office, Linux, Unix

(A) MS-Office

(B) Windows

(C) Linux

(D) Unix

Q.44. 'मुख्य कार्य' या निकषाच्या आधारे खालील गटात न बसणारा घटक ओळखा :

Windows, Android, MS-Office, Linux,Unix

(A) एमएस ऑफिस

(B) विंडोज्

(C) लिनक्स

(D) युनिक्स



Q.45.What is the full form of PDF in the context of computer file system?

(A) Personalised Data Format

(B) Pixel Digital File

(C) Pictured Data Format

(D) Portable Document Format

Q.45.संगणकीय फाईलींच्या संदर्भात PDF या लघुरूपाचा विस्तार काय ?

(A) पर्सनलाईज्ड् डेटा फॉर्मेट

(B) पिक्सेल डिजिटल फाईल

(C) पिक्चर्ड डेटा फॉर्मेट

(D) पोर्टेबल डॉक्युमेन्ट फॉर्मेट



Q.46. Which of the following is a 'cloud computing' based data storage facility ?

(A) Play store

(B) G-mail storage

(C) Drop box

(D) Cloud stick

Q.46. खालीलपैकी कोणती सेवा 'क्लाऊड कंप्युटींग' तंत्रज्ञानावर आधारीत डेटा साठवणूक सेवा आहे ?

(A) प्ले स्टोअर

(B) जी-मेल स्टोअरेज

(C) ड्रॉप बॉक्स

(D) क्लाऊड स्टीक



Q.47. Which of the following is the correct statements in the context of web 2.0 facilities ?

(A) Communication on these facilities is mostly one-way

(B) Content on these facilities is generated mostly by users

(C) These facilities are much more cheaper to establish

(D) These facilities use more ad- vanced distribution technologies

Q.47. 'वेब 2.0' सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ?

(A) या सुविधांवरील संज्ञापन मुख्यत्त्वे एकतर्फी असते

(B) या सुविधांवरील आशय मुख्यत्त्वे वापरकर्त्यांनीच तयार केलेला असतो

(C) या सुविधा उभारणे हे फार कमी खर्चाचे काम असते

(D) या सुविधा अधिक प्रगत वितरण तंत्रज्ञान वापरतात



Q.48. Identify the correct pair from the following :

(A) Ubantu — Operating System

(B) Excel — Word Processing Software

(C) AVI — File Transfer Protocol

(D) HDD — Cloud Storage Facility

Q.48. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा :

(A) उबंटू (Ubantu) — ऑपरेटिंग सिस्टीम

(B) एक्सेल (Excel) — वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर

(C) एव्हीआय (AVI) — फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल

(D) एचडीडी (HDD) –– क्लाऊड साठवणूक सुविधा



Q.49. A part of the large quantity of fly ash produced in a thermal power plant is used for:

(A) Soil conditioner

(B) Making bricks

(C) Road making

(D) Burning

Q.49. औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख कांही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते :

(A) शेतीसाठी

(B) विट तयार करण्यासाठी

(C) रस्ते निर्माण करण्यासाठी

(D) इंधन म्हणून



Q.50. World Environment Day is celebrated every year on ……….

(A) 5th July

(B) 5th June

(C) 25th January

(D) 5th December

Q.50. जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो ?

(A) 5 जूलै

(B) 5 जून

(C) 25 जानेवारी

(D) 5 डिसेंबर



Q.51. Which of the following Acts gives rights to citizens to file cases against violation of environmental norms?

(A) Environment (Protection) Act

(B) Air Pollution Act

(C) Water Pollution Act

(D) Forest Act

Q.51. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे ?

(A) पर्यावरण संरक्षण कायदा

(B) हवा प्रदूषण कायदा

(C) जल प्रदूषण कायदा

(D) वन संवर्धन कायदा



Q.52. Which of the following gases is largely responsible for global warming ? '

(A) Sulphur dioxide

(B) Carbon dioxide

(C) Chlorine

(D) Ammonia

Q.52. खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्तकरून कारणीभूत आहेत ?

(A) सल्फर डायऑक्साईड

(B) कार्बन डायऑक्साईड

(C) क्लोरीन

(D) अमोनिया



Q.53. Which one of the following in not non-conventional energy source ?

(A) Solar

(B) Tidal

(C) Geothermal

(D) Coal

Q.53. खालीलपैकी कोणता अपारंपारिक ऊर्जा स्रोत नाही ?

(A) सौर

(B) भरती-ओहोटी

(C) भूऔष्णिक

(D) कोळसा



Q.54. Which of the following is the top carnivorous animal ?

(A) Bird

(B) Snake

(C) Buffalo

(D) Tiger

Q.54. खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांसभक्षक आहे ?

(A) पक्षी

(B) साप

(C) म्हैस

(D) वाघ



Q.55. Which one of the following e-repository is for doctoral research of Indian Universities? 

(A) Dnyanganga

(B) Shodhaganga

(C) Bookganga

(D) INFLIBNET

Q.55. भारतीय विद्यापीठातील विद्यावाचस्पती संशोधनासाठी खालीलपैकी कोणते ई-भांडार आहे ?

(A) ज्ञानगंगा

(B) शोधगंगा

(C) बुकगंगा

(D) इनफ्लिबनेट



Q.56. Which one of the following agency" is to formulate policies of higher education ?

(A) UGC

(B) MHRD

(C) NCERT

(D) NAAC

Q.56. खालीलपैकी कोणती संस्था उच्चशिक्षणातील धोरणांची निश्चिती करते ?

(A) युजीसी

(B) एम एच आर डी

(C) एनसीईआरटी

(D) नॅक



Q.57. Which one of the following is responsible for assessment and accreditation of higher education institutions in India ?

(A) UGC

(B) NAAC

(C) NCTE

(D) AICTE

Q.57. भारतातील उच्चशिक्षणाच्या मुल्यांकनाची व अधिस्विकृतीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ?

(A) युजीसी

(B) नॅक

(C) एनसीटीई

(D) एआयसीटीई



Q.58. As per UGC 10-point grading system for CBCS, the letter grade "A+” means :

(A) Outstanding

(B) Very Good

(C) Excellent

(D) Good

58. युजीसीच्या दहा – बिंदु सी.बी.सी.एस. पद्धतीमध्ये, श्रेणी “A+” म्हणजे :

(A) उत्कृष्ट

(B) अतिशय चांगला

(C) उत्तम

(D) चांगला



Q.59. A unit by which the course work is measured : 

(A) Credit

(B) Grade

(C) Grade Point

(D) Credit Point

Q.59. एकक की जे शिक्षणक्रमाचे मापन करते ते :

(A) श्रेयांक

(B) श्रेणी

(C) श्रेणी बिंदु

(D) श्रेयांक बिंदु



Q.60. Which was the first open university in India ?

(A) Dr. B.R. Ambedkar Open University

(B) Yashwantrao Chavan Maharashtra Open University

(C) Indira Gandhi National Open University

(D) Netaji Subhash Open University

Q.60. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते ?

(A) डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ

(B) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

(C) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

(D) नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ




Post a Comment

Previous Post Next Post