tags : set exam paper 1 question paper with answers pdf, set exam paper 1 syllabus in marathi pdf, set exam paper 1 books pdf, set exam paper 1 syllabus pdf, set exam paper 1 syllabus, best book for set exam paper 1, set exam paper 1 model question with answers,
![]() |
#2 |
Q.1. Understanding level of teaching includes ………….
(i) Memory
(ii) Aptitude
(iii) Insight
(iv) Creativity
(A) (i) and (ii)
(B) (ii) and (iii)
(C) (i) and (iii)
(D) (ii) and (iv)
Q.1. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये ……….. चा अंतर्भाव होतो.
(i) स्मरण
(ii) अभियोग्यता
(iii) मर्मदृष्टी
(iv) सर्जनशीलता
(A) (i) आणि (ii)
(B) (ii) आणि (iii)
(C) (i) आणि (iii)
(D) (ii) आणि (iv)
Q.2. The most intellectually fertile period of a human being is ………..
(A) Childhood
(B) Adolescence
(C) Adulthood
(D) Old age
Q.2. मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ …………. हा होय.
(A) बालपण
(B) कुमारावस्था
(C) प्रौढावस्था
(D) वृद्धत्व
Q.3. 'Online Discussion Forum' of SWAYAM is for …………
(A) Clearing the doubts
(B) Self-assessment
(C) Watching video lectures
(D) Downloading reading material
Q.3. SWAYAM चा ‘ऑनलाईन डिस्कशन फोरम' ………….. असतो.
(A) शंकासमाधान करण्यासाठी
(B) स्वयं-मूल्यांकनासाठी
(C) व्हिडीओ लेक्चर्स् पाहण्यासाठी
(D) वाचनसाहित्य डाऊनलोड करण्यासाठी
Q.4. History cannot be taught by using …………..
(A) Digital charts
(B) Maps
(C) Demonstration method
(D) Role play method
Q.4. …………. चा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही.
(A) डिजीटल तक्ते
(B) नकाशे
(C) दिग्दर्शन पद्धती
(D) भूमिकापालन पद्धती
Q.5. Absolute and relative grading are types of ………. grading.
(A) Indirect
(B) Direct
(C) Special
(D) Standard
Q.5. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे ………. श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत.
(A) अप्रत्यक्ष
(B) प्रत्यक्ष
(C) विशेष
(D) प्रमाणित
Q.6. Most essential quality for a researcher is …………
(A) Punctuality
(B) Intelligence
(C) Genuine interest in research
(D) Mastery over own subject
Q.6. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण हा होय.
(A) वक्तशीरपणा
(B) बुद्धिमत्ता
(C) संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची
(D) स्वत:च्या विषयावरील प्रभुत्व
Q.7. Recording of 'reflective notes' in qualitative research is called as …………
(A) Coding
(B) Memoing
(C) Decoding
(D) Instructing
Q.7. गुणात्मक संशोधनात 'चिंतनशील टिपा'च्या नोंदी करणे यास ……….. असे म्हणतात.
(A) सांकेतिकीकरण (Coding)
(B) टिपण काढणे (Memoing)
(C) नि:सांकेतिकीकरण (Decoding)
(D) सूचना करणे (Instructing)
Q.8 .A variable 'Academic Achievement' will be measured on ………..
(A) Nominal
(B) Interval
(C) Ratio
(D) Ordinal
Q.8. 'शैक्षणिक संपादन' हे चल ……… श्रेणीवर मोजले जाईल.
(A) नामांकन
(B) आंतर
(C) गुणोत्तर
(D) क्रमांकन
Q.9. If a frequency distribution has some extreme scores then appropriate measure of central tendency will be …………
(A) Mean
(B) Median
(C) Mode
(D) Range
Q.9. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण ………. हे असेल.
(A) मध्यमान
(B) मध्यांक
(C) बहुलक
(D) विस्तार
Q.10. A research paper is based on ………..
(i) Primary data
(ii) Secondary data
(iii) Descriptive data
(A) Only (i)
(B) Only (ii)
(C) (i) and (ii)
(D) (ii) and (iii)
Q.10. संशोधन लेख (Research paper) ……….. वर आधारित असतो..
(i) प्राथमिक माहिती (data)
(ii) दुय्यम माहिती
(iii) वर्णनात्मक माहिती
(A) केवळ (i)
(B) केवळ (ii)
(C) (i) आणि (ii)
(D) (ii) आणि (iii)
Directions :
Answer Question Nos. 11 to 15 based on either the English passage or the Marathi passage:
An earthquake comes like a thief in the night, without warning. It was necessary, therefore to invent instruments that neither slumbered nor slept. Some devices were quite simple. One, for instance, consisted of rods of various lengths and thicknesses which would stand up on end like ninepins. When a shock came it shook the rigid table upon which these stood. If it were gentle, only the more unstable rods fell. If it were severe, they all fell. Thus, the rods by falling and by the direction in which they fell, recorded for the slumbering scientist, the strength of a shock that was too weak to waken him and the direction from which it came. But, instruments far more delicate than that were needed if any really serious advance was to be made.
The ideal to be aimed at was to devise an instrument that could record with a pen on paper the movements, of the ground or of the table, as the quake passed by. While I write my pen moves but the paper keeps still. With practice, no doubt, I could, in time, learn to write by holding the pen still while the paper moved. That sounds a silly suggestion, but that was precisely the idea adopted in some of the early instruments (seismometers) for recording earthquake waves. But when table, penholder and paper are all moving how is it possible to write legibly? The key to a solution of that problem lay in an everyday observation. Why does a person standing in a bus or train tend to fall when a sudden start is made? It is because his feet move on, but his head stays still.
11. This passage says that early instruments for measuring earthquakes were ………..
(A) Faulty in design
(B) Expensive
(C) Not sensitive enough
(D) Not sturdy
12. The author says that it was necessary to invent instruments to observe an earthquake because ............
(A) We have to prove that we are technically sound
(B) An earthquake comes all of a sudden like a thief
(C) It will allow us to show our expertise
(D) We have to keep ourselves busy
Q.13. The earlier device consisting of rods was replaced because it failed ………
(A) To measure a severe earthquake
(B) To record the direction of the earthquake
(C) To measure a gentle earthquake
(D) To record the movements with a pen on paper
Q.14. The everyday observation mentioned in the passage is related to ………...
(A) The tendency of a standing person to fall when a bus or train moves suddenly
(B) The movement of a bus or train
(C) The passengers standing in a bus or train
(D) The sudden start of a train
Q.15. According to the passage, the meaning of the word 'slumber' is ………..
(A) Shock
(B) Sleep
(C) Ground
(D) Suggestion
सूचना :
प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उताऱ्यावर आधारित आहेत. इंग्रजीतील किंवा मराठीतील उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या :
भारतीय हिंदू संस्कृती आणि समाजव्यवस्था एक चमत्कारिक आणि वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था आणि संस्कृती आहे. तिच्यासारखी संस्कृती आणि व्यवस्था जगाच्या नकाशावर सापडणे अवघड आहे. म्हणून ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिच्या या वैशिष्ट्याचा तिच्या जन्मापासून जसा एकीकडून गौरव झालेला आहे तसाच तिचा धिःकारही झालेला आहे. पाश्चिमात्य देशात जेव्हा राष्ट्रा-राष्ट्रात संघर्ष होतात, मानवी जीवन भयग्रस्त आणि बकाल बनलेले असते, तेव्हा उत्तम दर्जाच्या वाङ्मयीन कलाकृती जन्माला येतात असे मानले जाते. आधुनिक काल- खंडातील काफ्का आणि इतर अस्तित्ववादी कलावंताची उदाहरणे यासाठी घेतली जातात.
भारतीय हिंदू समाजात हा विचार उलट्या अर्थाने खरा आहे. कारण भारतीय हिंदू समाज हा त्याच्या इतिहासात सतत युद्धमान असलेला समाज आहे. त्याला परकीय आक्रमणाची आवश्यकता केवळ युद्धमान बनण्यासाठी मुळीच नाही. हिंदू संस्कृतीच्या वैशिष्ट्यातच भारतीय समाजाला सतत युद्धमान आणि भयग्रस्त ठेवण्याची तरतूद आहे. या वैशिष्ट्याच्या बाजूने आणि विरुद्ध असा जो सांस्कृतिक संघर्ष भारतीय इतिहासात सुप्त किंवा प्रकटपणे चालू होता आणि आहे त्याला टाळून भारतात वाङ्मयनिर्मिती होणे शक्यच नव्हते. म्हणून ती तशीच झालेली आपल्याला दिसते. प्राचीन भारतीय वाङ्मयाला जर सामाजिक आणि मानववंशशास्त्रीय कसोट्यांवर तपासले, तत्त्वज्ञानाच्या अंगाने त्याचे मूल्य शोधले किंवा सौंदर्यदृष्टीनेही त्याची समीक्षा केली तरी हा संघर्ष आपल्याला परिणामकारकरित्या जाणवू शकतो.
Q.11. भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण काय ?
(A) चमत्कारिकता
(B) सामाजिक व्यवस्था
(C) एकमेवाद्वितीयता
(D) भारतीयता
Q.12. पाश्चिमात्य राष्ट्रे नेहमी बकाळ आणि भयग्रस्त जीवन जगत असतात; कारण त्यांची वाङ्मयनिर्मिती नेहमीच राष्ट्रसंघर्षाला प्रोत्साहन देतात.
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) संपूर्ण विधान चूक
(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(D) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
Q.13. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे
(A) सांस्कृतिक परिवर्तन
(B) हिंदूत्वनिष्ठा
(C) आत्मियता
(D) युद्धजन्यता
Q.14. भारतीय वाङ्मयनिर्मितीची प्रेरणा कशात आहे ?
(A) संस्कृतीसंघर्षात
(B) भारतीय तत्त्वज्ञानात
(C) भारतीय इतिहासात
(D) ऐतिहासिक संघर्षात
Q.15. प्रस्तुत उताऱ्यास कोणते शीर्षक अधिक समर्थक आहे ?
(A) वाङ्मय आणि संघर्ष
(B) वाङ्मय आणि संस्कृती
(C) वाङ्मय आणि इतिहास
(D) वाङ्मय आणि तत्त्वज्ञान
Q.16. According to Newcomb …………. is not so much important in communication cycle.
(A) Sender
(B) Receiever
(C) Media
(D) Message
Q.16. न्यूकोंबच्या मते, संप्रेषण चक्रामध्ये …………… हा फार महत्त्वाचा घटक नसतो.
(A) प्रेषक
(B) ग्राहक
(C) माध्यम
(D) संदेश
Q.17. What is one of the following most important factors to become communication effective?
(A) Media
(B) Message
(C) Sender
(D) Immediate feedback
Q.17. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो ?
(A) माध्यम
(B) संदेश
(C) प्रेषक
(D) त्वरित प्रत्याभरण
Q.18. Supervisor in factory orders workers and workers follows the order. This ……….. type of communication.
(A) Vertical
(B) Horizontal
(C) Non-formal
(D) Distance
Q.18. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली. हे संप्रेषण ………. प्रकारचे आहे.
(A) अनुलंब
(B) क्षैतिज
(C) अनौपचारिक
(D) दूरस्थ
Q.19. Unattentiveness of receiver may affect
(A) Sender
(B) Message
(C) Media
(D) Effectiveness of communication
Q.19. ग्राहकाचे अनावधान हे ………..वर परिणाम करू शकते.
(A) प्रेषक
(B) संदेश
(C) माध्यम
(D) संप्रेषणाची परिणामकारकता
Q.20. Programmes on the T.V. channels sometimes misleads society because ………..
(A) Audiences are in large numbers
(B) Audiences are illiterate
(C) Audience group is heterogeneous
(D) Difference in sender and receivers perception
Q.20. दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात, कारण ………..
(A) श्रोत्यांची संख्या खूप असते
(B) श्रोते निरक्षर असतात
(C) श्रोत्यांचा समूह बहुजिनसी असतो
(D) प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक
Q.21. Consider a road map of a city having 5 approach roads from other places, 10 junctions and no internal road has a dead-end. Every junction except one is associated with 4 roads. If n number of roads are associated with the remaining junction then which of the following values is impossible for n ?
(A) 3
(B) 5
(C) 6
(D) 7
Q.21. एका शहराच्या रस्त्यांचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला पाच रस्त्यांनी इतर ठिकाणाहून जोडलेले आहेत, दहा चौक आहेत ( अनेक रस्ते एकत्र येणारी ठिकाणे) व कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंदटोक नाही. एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की प्रत्येक चौकात चार रस्ते मिळतात. जर दहाव्या चौकात n रस्ते मिळत असतील तर खालीलपैकी कोणती n ची किंमत अशक्य आहे ?
(A) 3
(B) 5
(C) 6
(D) 7
Q.22. An honest person somehow guaranteed to two different persons X and Y individually to handover complete amount available in his purse. In which way/ situation he will fulfill his assurance given to X and Y at one and the same time ?
(A) If there is no money in his purse
(B) By paying each one of them half of the money available in the purse
(C) By paying nothing to anyone of them
(D) In the purse the number of notes / coins of same amount is even
Q.22. एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून दोन व्यक्तींना त्यांच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेली वचन तो पाळू शकतो ?
(A) पर्समध्ये काहीच रक्कम नसताना
(B) पर्समधील रक्कम निम्मी निम्मी वाटून दिल्याने
(C) कोणालाही काहीच रक्कम न दिल्याने
(D) त्याच्या पर्समध्ये सारख्या किंमतीच्या नोटा / नाणी यांची संख्या सम आहे
Q.23. Immediately after 12 o'clock at what time duration both the minute hand and the hour hand of a watch exactly overlap ?
(A) One hour
(B) One hour five minutes
(C) After 1 hour five minutes and before one hour six minutes
(D) After one hour six minutes 24.
Q.23. बारा वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील ?
(A) एक तास
(B) एक तास पाच मिनिटे
(C) एक तास पाच मिनिटांनंतर व एक तास सहा मिनिटांअगोदर
(D) एक तास सहा मिनिटांनंतर
Q.24 As the price of a book is reduced by 20%, then its consumption is increased by 25%. How much percentage difference is there in the previous income ?
(A) 10
(B) 20
(C) 25
(D) 0
Q.24 एका पुस्तकाची किंमत शेकडा 20 ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला. तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला ?
(A) 10
(B) 20
(C) 25
(D) 0
Q.25. The percentage profit earned by selling an item for Rs. 2120 is same as the percentage loss incurred by selling the same item for Rs. 1480. At what price should the item be sold to get 20% profit ?
(A) 2160
(B) 2200
(C) 2050
(D) 1900
Q.25. एक वस्तू 2120 रु. ने विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1480 रु. ने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल, तर ती वस्तू किती किंमतीस विकल्यास 20% नफा होईल ?
(A) 2160
(B) 2200
(C) 2050
(D) 1900
Q.26. Arrange the following terms in a meaningful-logical order indicating the correct order.
1. Poverty
2. Population
3. Death
4. Unemployment
5. Disease
(A) 4 – 2 – 1 – 5 – 3
(B) 2 – 4 – 1 – 5 – 3
(C) 1 – 5 – 2 – 4 – 3
(D) 5 – 1 – 4 – 2 – 3
Q.26. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शविणाऱ्या पद्धतीने मांडा.
1. दारिद्र्य
2. लोकसंख्या
3. मृत्यू
4. बेरोजगारी
5. आजार
(A) 4 – 2 – 1 – 5 – 3
(B) 2 – 4 – 1 – 5 – 3
(C) 1 – 5 – 2 – 4 – 3
(D) 5 – 1 – 4 – 2 – 3
Q.27. Suppose that X is a set of some real numbers. From which of the following statements does not deduce the other statements?
(A) Between any two numbers in X, there is at least one number in X.
(B) Between any two numbers in X, there are at least two numbers in X.
(C) Between any two numbers in X, there are infinitely many numbers in X.
(D) If X contains at least two numbers then X contains infinitely many numbers.
Q.27. समजा X हा काही वास्तव संख्यांचा संच आहे. खालीलपैकी कोणत्या विधानावरून इतर विधानांची सिद्धता देता येत नाही ?
(A) X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये, एकतरी संख्या X मध्ये आहे.
(B) X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये, X मधील कमीतकमी दोन संख्या असतात.
(C) X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये, X मधील अनंत संख्या असतात.
(D) X या संचात कमीतकमी दोन संख्या असल्यास, X मध्ये अनंत संख्या असतात.
Q.28. There are 7 persons in a party. The number of hands shaken all together in the party counted with multiplicity, cannot be :
(A) 5
(B) 6
(C) 10
(D) 2
Q.28. एका पार्टीत 7 व्यक्ती आहेत. या पार्टीमध्ये हस्तांदोलनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या (वारंवारतेनुसार मोजल्यास) खालीलपैकी कोणती असू शकत नाही ?
(A) 5
(B) 6
(C) 10
(D) 2
Q.29. If two distinct circles in a plane are intersecting each other, then they intersect in :
(A) exactly one point
(B) infinitely many points
(C) at the most two points
(D) exactly two points
29. प्रतलातील दोन वर्तुळे एकमेकांना छेदत असल्यास :
(A) एकच छेदन बिंदू असतो
(B) अनंत छेदन बिंदू असतात
(C) जास्तीत जास्त दोन छेदन बिंदू असतात
(D) दोन आणि दोनच छेदन बिंदू असतात
Q.30. If the word PRINCE is coded as 151781324 in a code language, then what should be the code for the word KING in the same language?
(A) 108136
(B) 119135
(C) 109145
(D) 118146
Q.30. एका सांकेतिक भाषेत PRINCE या शब्दाचा संकेत 151781324 असा आहे. तर त्याच भाषेत KING या शब्दाचा संकेतांक काय असेल ?
(A) 108136
(B) 119135
(C) 109145
(D) 118146
Q.31. Based on the following statements which of the conclusion's given below will follow/s ?
Statement I: All the bowlers of my team are wicket takers.
Statement II: Varun is not a wicket taking bowler.
Conclusion 1 : Varun is a spin bowler.
Conclusion 2 : Varun is not a bowler of my team.
(A) Only 1
(B) Only 2
(C) Both 1 and 2
(D) Neither 1 nor 2
Q.31. पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणता (ते) निष्कर्ष काढता येतात ?
विधान I माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत.
विधान II वरुण हा विकेट घेणारा गोलंदाज नाही.
निष्कर्ष 1 : वरुण फिरकी गोलंदाज आहे.
निष्कर्ष 2: वरुण माझ्या संघातील गोलंदाज नाही.
(A) फक्त 1
(B) फक्त 2
(C) 1 व 2 दोन्हीही
(D) 1 व 2 दोन्हीही नाही
Q.32. Based on the following statements, which of the conclusion/s will follow/s ?
Statement I: All apples are mangoes.
Statement II: All mangoes are bananas.
Conclusion 1 : All apples are bananas.
Conclusion 2: Some bananas are mangoes.
(A) Only 1
(B) Only 2
(C) Both 1 and 2
(D) Neither 1 nor 2
Q.32. पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणता (ते) निष्कर्ष काढता येतात ?
विधान I : सर्व सफरचंद आंबे आहेत.
विधान II : सर्व आंबे केळी आहेत.
निष्कर्ष 1 : सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष 2 : काही केळी आंबे आहेत.
(A) फक्त 1
(B) फक्त 2
(C) 1 व 2 दोन्हीही
(D) 1 व 2 दोन्हीही नाही
Q.33. If the word FROG is coded as 719168, then what should be the code for TRIP?
(A) 21181016
(B) 21191017
(C) 2019917
(D) 2119916
Q.33. एका सांकेतिक भाषेत जर FROG हा शब्द 719168 असा लिहिला, तर त्याच भाषेत TRIP या शब्दाचा संकेतांक काय ?
(A) 21181016
(B) 21191017
(C) 2019917
(D) 2119916
Q.34. Which one is the odd-one out from the following ?
(A) FEG
(B) TSU
(C) NML
(D) ROS
Q.34. खालीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे ?
(A) FEG
(B) TSU
(C) NML
(D) RQS
Q.35. Five players, P, Q, R, S and T are playing cards on a table facing the center. P is on the left of Q but not a neighbour of T. S is on the right of R and is not a neighbour of Q. T is on the right of Q. Who is on the right of S ?
(A) R
(B) P
(C) T
(D) Q
Q.35. पाच खेळाडू, P Q R S आणि T एका टेबलाभोवती पत्ते खेळत आहेत. P हा Q च्या डाव्या बाजूस बसला आहे, परंतू तो T चा शेजारी नाही. S हा Rच्या उजव्या बाजूला बसला असून तो Qचा शेजारी नाही. T हा Qच्या उजव्या बाजूस बसला आहे. तर Sच्या उजव्या बाजूस कोण आहे ?
(A) R
(B) P
(C) T
(D) Q
Q.36. Which of the alternatives will complete the following letter series ?
EGF, IKJ,........ QSR, UWV.
(A) MON
(B) LNM
(C) NPO
(D) MNO
36. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल ?
EGF, IKJ,........ QSR, UWV.
(A) MON
(B) LNM
(C) NPO
(D) MNO
Use the following table to answer questions 37 to 40 :
Distribution of students at graduate and post-graduate levels in seven institutes is given below :
प्रश्न क्र. 37 ते 40 साठी खालील तक्त्याचा उपयोग करावा :
सात संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे वितरण खालील तक्त्यात दिली आहे :
Q.37. Total number of students studying at post-graduate level in institutes N and O is :
(A) 5601
(B) 5944
(C) 6669
(D) 7004
Q.37. N आणि O या संस्थांमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे ?
(A) 5601
(B) 5944
(C) 6669
(D) 7004
Q.38. What is the total number of graduate and post-graduate students in institute Q?
(A) 8320
(B) 7916
(C) 9116
(D) 8372
Q.38. Q या संस्थेमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे ?
(A) 8320
(B) 7916
(C) 9116
(D) 8372
Q.39. What is the ratio between the number of students studying at post-graduate and graduate levels respectively from institute R ?
(A) 14 19
(B) 19: 21
(C) 17: 21
(D) 19: 14
Q.39. R या संस्थेतील पदव्युत्तर विद्यार्थी आणि पदवी विद्यार्थी यांच्या संख्यांचे गुणोत्तर काय आहे ?
(A) 14 19
(B) 19: 21
(C) 17: 21
(D) 19: 14
Q.40. What is the ratio between the number of students studying at post- graduate level from institute R and the number of students studying at graduate level from institute P ?
(A) 13: 19
(B) 21: 13
(C) 13: 8
(D) 19: 13
Q.40. R या संस्थेतील पदव्युत्तर विद्यार्थी आणि P या संस्थेतील पदवी विद्यार्थी यांच्या संख्यांमधील गुणोत्तर काय आहे ?
(A) 13: 19
(B) 21: 13
(C) 13: 8
(D) 19: 13
Q.41. If the total area under jowar is 1.5 million acres, what is the area under rice ?
(A) 6 million acres
(B) 7.5 million acres
(C) 9 million acres
(D) 4.5 million acres
Q.41. ज्वारीखालील क्षेत्र जर 15 लक्ष एकर असेल तर तांदुळा खालील क्षेत्र किती असेल ?
(A) 60 लक्ष एकर
(B) 75 लक्ष एकर
(C) 90 लक्ष एकर
(D) 45 लक्ष एकर
Q.42. If the production of wheat is 6 times that of barley, what is the ratio between the yield per acre of wheat and barley ?
(A) 3 : 2
(B) 3 : 1
(C) 12 : 1
(D) 2 : 3
Q.42. गव्हाचे उत्पादन बार्लीच्या उत्पादनाच्या सहापट असेल, तर गहू आणि बार्ली यांच्या प्रति एकरी उत्पादनांमधील गुणोत्तर काय असेल ?
(A) 3 : 2
(B) 3 : 1
(C) 12 : 1
(D) 2 : 3
Q.43. Which of the following is the correct chronology of internet based/ facilities ?
(A) Google, Hotmail, Facebook, Whatsapp
(B) Facebook, Google, Hotmail, Whatsapp
(C) Hotmail, Google, Facebook, Whatsapp
(D) Hotmail, Facebook, Google, Whatsapp
Q.43. इंटरनेट आधारीत खालील सेवांचा योग्य कालानुक्रम कोणता ?
(A) गुगल, हॉटमेल, फेसबुक, व्हॉटस्अॅप
(B) फेसबुक, गुगल, हॉटमेल, व्हॉटस्अॅप
(C) हॉटमेल, गुगल, फेसबुक, व्हॉटस्अॅप
(D) हॉटमेल, फेसबुक, गुगल, व्हॉटस्अॅप
Q.44. Identify the odd element from the following on the basis of its basic function :
Windows, Android, MS-Office, Linux, Unix
(A) MS-Office
(B) Windows
(C) Linux
(D) Unix
Q.44. 'मुख्य कार्य' या निकषाच्या आधारे खालील गटात न बसणारा घटक ओळखा :
Windows, Android, MS-Office, Linux,Unix
(A) एमएस ऑफिस
(B) विंडोज्
(C) लिनक्स
(D) युनिक्स
Q.45.What is the full form of PDF in the context of computer file system?
(A) Personalised Data Format
(B) Pixel Digital File
(C) Pictured Data Format
(D) Portable Document Format
Q.45.संगणकीय फाईलींच्या संदर्भात PDF या लघुरूपाचा विस्तार काय ?
(A) पर्सनलाईज्ड् डेटा फॉर्मेट
(B) पिक्सेल डिजिटल फाईल
(C) पिक्चर्ड डेटा फॉर्मेट
(D) पोर्टेबल डॉक्युमेन्ट फॉर्मेट
Q.46. Which of the following is a 'cloud computing' based data storage facility ?
(A) Play store
(B) G-mail storage
(C) Drop box
(D) Cloud stick
Q.46. खालीलपैकी कोणती सेवा 'क्लाऊड कंप्युटींग' तंत्रज्ञानावर आधारीत डेटा साठवणूक सेवा आहे ?
(A) प्ले स्टोअर
(B) जी-मेल स्टोअरेज
(C) ड्रॉप बॉक्स
(D) क्लाऊड स्टीक
Q.47. Which of the following is the correct statements in the context of web 2.0 facilities ?
(A) Communication on these facilities is mostly one-way
(B) Content on these facilities is generated mostly by users
(C) These facilities are much more cheaper to establish
(D) These facilities use more ad- vanced distribution technologies
Q.47. 'वेब 2.0' सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ?
(A) या सुविधांवरील संज्ञापन मुख्यत्त्वे एकतर्फी असते
(B) या सुविधांवरील आशय मुख्यत्त्वे वापरकर्त्यांनीच तयार केलेला असतो
(C) या सुविधा उभारणे हे फार कमी खर्चाचे काम असते
(D) या सुविधा अधिक प्रगत वितरण तंत्रज्ञान वापरतात
Q.48. Identify the correct pair from the following :
(A) Ubantu — Operating System
(B) Excel — Word Processing Software
(C) AVI — File Transfer Protocol
(D) HDD — Cloud Storage Facility
Q.48. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा :
(A) उबंटू (Ubantu) — ऑपरेटिंग सिस्टीम
(B) एक्सेल (Excel) — वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर
(C) एव्हीआय (AVI) — फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल
(D) एचडीडी (HDD) –– क्लाऊड साठवणूक सुविधा
Q.49. A part of the large quantity of fly ash produced in a thermal power plant is used for:
(A) Soil conditioner
(B) Making bricks
(C) Road making
(D) Burning
Q.49. औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख कांही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते :
(A) शेतीसाठी
(B) विट तयार करण्यासाठी
(C) रस्ते निर्माण करण्यासाठी
(D) इंधन म्हणून
Q.50. World Environment Day is celebrated every year on ……….
(A) 5th July
(B) 5th June
(C) 25th January
(D) 5th December
Q.50. जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो ?
(A) 5 जूलै
(B) 5 जून
(C) 25 जानेवारी
(D) 5 डिसेंबर
Q.51. Which of the following Acts gives rights to citizens to file cases against violation of environmental norms?
(A) Environment (Protection) Act
(B) Air Pollution Act
(C) Water Pollution Act
(D) Forest Act
Q.51. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे ?
(A) पर्यावरण संरक्षण कायदा
(B) हवा प्रदूषण कायदा
(C) जल प्रदूषण कायदा
(D) वन संवर्धन कायदा
Q.52. Which of the following gases is largely responsible for global warming ? '
(A) Sulphur dioxide
(B) Carbon dioxide
(C) Chlorine
(D) Ammonia
Q.52. खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्तकरून कारणीभूत आहेत ?
(A) सल्फर डायऑक्साईड
(B) कार्बन डायऑक्साईड
(C) क्लोरीन
(D) अमोनिया
Q.53. Which one of the following in not non-conventional energy source ?
(A) Solar
(B) Tidal
(C) Geothermal
(D) Coal
Q.53. खालीलपैकी कोणता अपारंपारिक ऊर्जा स्रोत नाही ?
(A) सौर
(B) भरती-ओहोटी
(C) भूऔष्णिक
(D) कोळसा
Q.54. Which of the following is the top carnivorous animal ?
(A) Bird
(B) Snake
(C) Buffalo
(D) Tiger
Q.54. खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांसभक्षक आहे ?
(A) पक्षी
(B) साप
(C) म्हैस
(D) वाघ
Q.55. Which one of the following e-repository is for doctoral research of Indian Universities?
(A) Dnyanganga
(B) Shodhaganga
(C) Bookganga
(D) INFLIBNET
Q.55. भारतीय विद्यापीठातील विद्यावाचस्पती संशोधनासाठी खालीलपैकी कोणते ई-भांडार आहे ?
(A) ज्ञानगंगा
(B) शोधगंगा
(C) बुकगंगा
(D) इनफ्लिबनेट
Q.56. Which one of the following agency" is to formulate policies of higher education ?
(A) UGC
(B) MHRD
(C) NCERT
(D) NAAC
Q.56. खालीलपैकी कोणती संस्था उच्चशिक्षणातील धोरणांची निश्चिती करते ?
(A) युजीसी
(B) एम एच आर डी
(C) एनसीईआरटी
(D) नॅक
Q.57. Which one of the following is responsible for assessment and accreditation of higher education institutions in India ?
(A) UGC
(B) NAAC
(C) NCTE
(D) AICTE
Q.57. भारतातील उच्चशिक्षणाच्या मुल्यांकनाची व अधिस्विकृतीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ?
(A) युजीसी
(B) नॅक
(C) एनसीटीई
(D) एआयसीटीई
Q.58. As per UGC 10-point grading system for CBCS, the letter grade "A+” means :
(A) Outstanding
(B) Very Good
(C) Excellent
(D) Good
58. युजीसीच्या दहा – बिंदु सी.बी.सी.एस. पद्धतीमध्ये, श्रेणी “A+” म्हणजे :
(A) उत्कृष्ट
(B) अतिशय चांगला
(C) उत्तम
(D) चांगला
Q.59. A unit by which the course work is measured :
(A) Credit
(B) Grade
(C) Grade Point
(D) Credit Point
Q.59. एकक की जे शिक्षणक्रमाचे मापन करते ते :
(A) श्रेयांक
(B) श्रेणी
(C) श्रेणी बिंदु
(D) श्रेयांक बिंदु
Q.60. Which was the first open university in India ?
(A) Dr. B.R. Ambedkar Open University
(B) Yashwantrao Chavan Maharashtra Open University
(C) Indira Gandhi National Open University
(D) Netaji Subhash Open University
Q.60. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते ?
(A) डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ
(B) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
(C) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
(D) नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ