Q.१. ‘पंचवार्तिक’ या पहिल्या व्याकरण ग्रंथाचा निर्माता कोण ?
(A) भीष्माचार्य
(B) नागदेवाचार्य
(C) कविश्वराचार्य
(D) कृष्णमुनी डिंभ
Q.२. ‘पाईकीचे अभंग’ कोणी लिहिले ?
(A) संत तुकाराम
(B) कान्होबा
(C) वेणाबाई
(D) जनाबाई
Q.३. भिन्न भिन्न वृत्तांमधील ‘ज्ञानेश्वरविजय’ आणि ‘चिद्बोध रामायण’ या ग्रंथांची रचना पुढीलपैकी कोणत्या कवीची आहे ?
(A) निरंजनमाधव
(B) अमृतराय
(C) आनंदतनय
(D) कचेश्वर ब्रम्हे
Q.४. शाहीर सगनभाऊ यांचा साथीदार कोन होता ?
(A) रामा सुतार
(B) रामा न्हावी
(C) रामा गोंधळी
(D) रामा कुंभार
Q.५. ‘शिवदिग्विजया’चा कर्ता कोण ?
(A) चित्रगुप्त
(B) खंडो बल्लाळ चिटणीस
(C) त्रिंबक सदाशिव पुरंदरे
(D) कृष्णाजी अनंत सभासद
Q.६. ‘रविकिरणमंडळा’त केवळ एकच सूर्य होता; तथापि अन्य सर्व कवी केवळ किरणे होती, अशा आशयाच्या विधानातील ‘सूर्य’ हे संबोधन कोणाला उद्देशून आहे ?
(A) यशवंत
(B) गिरीश
(C) माधव ज्यूलिअन
(D) यशवंत
Q.७. कादंबऱ्या आणि कादंबरीकार यांच्या जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या पर्यायामधून उचित पर्याय निवडा :
यादी (१)
(1) झेलझपाट
(2) हाकुमी
(3) महानदीच्या तीरावर
(4) डांगाणी
यादी (२)
(5) दुर्गा भागवत
(6) अनिल सहस्रबुद्धे
(7) गोदावरी परुळेकर
(8) सुरेश द्वादशीवार
(9) मधुकर वाकोडे
पर्याय :
(A) 1-5, 2-6, 3-7, 4-8
(B) 1-8, 2-9, 3-7, 4-6
(C) 1-8, 2-7, 3-6, 4-5
(D) 1-9, 2-8, 3-5, 4-6
Q.८. ‘आणि बाकीचे सगळे’ आणि ‘बिनमौजेच्या गोष्टी’ हे कथासंग्रह कोणाचे ?
(A) श्याम मनोहर
(B) नरेश
(C) रंगनाथ पठारे
(D) श्री. दा. पानवलकर
Q.९. पुढील नाटकांतील कोणती नाट्यकृती ‘ब्लॅक कॉमेडी’च्या प्रकारात गणली जाते ?
(A) शनिवार – रविवार
(B) बेगम बर्वे
(C) महापूर
(D) महानिर्वाण
Q.१०. ‘निंबोणीच्या झाडामागे’ हे ललितलेखन कोणाचे ?
(A) मधुकर केचे
(B) श्रीनिवास कुलकर्णी
(C) मंगेश पाडगावकर
(D) विजय तेंडूलकर
Q.११. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द कन्नड भाषेतून मराठी भाषेत आले आहेत ?
(A) भीड, गुंड, भंगार
(B) मुंगी, वारिक, कापडी
(C) अंधार, आरोगण, ओगळ
(D) मेहूण, भाऊ, पाऊस
Q.१२. सांकल्पनिक अर्थ समान असणारा शब्दांचा गट कोणता ?
(A) डोळा, कान, नाक
(B) डोके, हात, पाय
(C) डोळा, नेत्र, चक्षू
(D) हात, पाय, बाहू
Q.१३. वैद्य-गुणे ह्यांच्यातील वादामुळे प्रामुख्याने कोणत्या मुद्यांच्या विचारस चालना मिळाली ?
(A) मराठीच्या उत्पत्तीचा काल व कारण
(B) शिलालेखांचे पौर्वापर्य
(C) ताम्रपटांची सत्यासत्यता
(D) शंकराचार्यांचा काळ
Q.१४. पुढीलपैकी कोणता विशेष बोलीभाषेचा नाही ?
(A) उत्स्फूर्तता व स्वाभाविकता
(B) व्याकरणाची अनुपस्थिती
(C) अनौपचारिक व्यवहारात वापर
(D) मौखिक व्यवहारात प्राधान्य
Q.१५. ‘ऐ’ व ‘औ’ हे मराठीतील स्वर :
(A) थेट संस्कृतमधून आले आहेत
(B) जवळच्या स्वरांचा संयोग करण्याच्या प्रवृत्तीतून आले आहेत
(C) प्रकृतातून आले आहेत
(D) अपभ्रंशातून आले आहेत
Q.१६. “तत् अदौषौ शब्दार्थौं सगुणौ अनलंकृती पुनः क्वापि ||” ही व्याख्याची व्याख्या कोणी केली आहे ?
(A) जगन्नाथ
(B) विश्वनाथ
(C) मम्मट
(D) वामन
Q.१७. काव्याचे ‘शिरोभूत’ प्रयोजन कोणते मानले जाते ?
(A) आनंद
(B) कीर्ति
(C) प्रचार
(D) धर्म
Q.१८. ‘गौडी’ रितीत कोणत्या गुणाचे प्राचुर्य असते ?
(A) श्लेष
(B) ओज
(C) प्रसाद
(D) सौकुमार्य
Q.१९. ‘वीर’ रसाचा स्थायीभाव कोणता आहे ?
(A) कांती
(B) रति
(C) जुगुप्सा
(D) ओजस्
Q.२०. ‘जुगुप्सा’ या स्थायीभावापासून कोणत्या रसाची निष्पत्ती होते ?
(A) करुण
(B) बीभत्स
(C) हास्य
(D) अद्भुत
Q.२१. ‘पाया-इमला’ सिद्धांत कोणी मांडला आहे ?
(A) ल्युकाच
(B) कार्ल मार्क्स
(C) मार्क्युज
(D) सार्त्र
Q.२२. ‘संस्कारनिष्ठता’ हे कोणत्या समीक्षा पद्धतीचे वैशिष्ट्य आहे ?
(A) आस्वादक
(B) मार्क्सवादी
(C) रुपवादी
(D) समाजशास्त्रीय
Q.२३. ‘आहे मनोहर तरी’ या आत्मचरित्राची शैलीवैज्ञानिक समीक्षा पुढीलपैकी कोणत्या समिक्षकाने केली आहे ?
(A) द. दि. पुंडे
(B) चंद्रशेखर जहागीरदार
(C) रमेश धोंगडे
(D) रमेश तेंडूलकर
Q.२४. ‘सामुहिक नेणीव’ ही संकल्पना कोणी मांडली आहे ?
(A) एफ. आर. लेविस
(B) लांकान
(C) कार्ल युंग
(D) सिग्मंड फ्राईड
Q.२५. जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या पर्यायामधून उचित पर्याय निवडा :
यादी (१)
(1) कविता आणि प्रतिमा
(2) काव्याची भूषणे
(3) कवितेचा रुपशोध
(4) कवितेविषयी
यादी (२)
(5) म.सु.पाटील
(6) सुधीर रसाळ
(7) वसंत आबाजी डहाके
(8) म. वा. धोंड
(9) गंगाधर पाटील
पर्याय :
(A) 1-8, 2-6, 3-9, 4-7
(B) 1-5, 2-9, 3-6, 4-8
(C) 1-6, 2-8, 3-5, 4-7
(D) 1-9, 2-6, 3-8, 4-5
Q.२६. नाटकाला ‘अभिनेयार्थ काव्य’’ असे कोणी म्हटले आहे ?
(A) भामह
(B) दंडी
(C) उद्भट
(D) वामन
Q.२७. अॅरिस्टॉटलने साहित्यप्रकारांचे वर्गीकरण करताना पुढीलपैकी कशाला स्थान दिलेले नाही ?
(A) विलापिका
(B) लिरिक
(C) उद्देशिका
(D) शोकनाट्य
Q.२८. पुढीलपैकी कोणत्या साहित्यप्रकाराचे स्वरूप संमिश्र आहे ?
(A) चरित्र
(B) कादंबरी
(C) नाटक
(D) कथा
Q.२९. कलाप्रकार व साहित्यप्रकार यांच्याविषयीचे सिद्धांत म्हणजे बौद्धिकतावादी घोडचुकीचा सर्वांत मोठा विजय,असे कोणी सांगितले ?
(A) अॅरिस्टॉटल
(B) प्लेटो
(C) काण्ट
(D) क्रोचे
Q.३०. ‘ट्रॅजिडी इज अ सेन्स ऑफ मॅन्स पार्टीसिपेशन इन प्रोसेस बियोंड हिमसेल्फ’ ही व्याख्या कोणाची ?
(A) केनेथ ब्रूक
(B) जॉर्ज लुकाक्स
(C) हिलमन
(D) लेस्की एल्बिन
Q.३१. ‘डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी’ ह्या संस्थेची स्थापना कोणी केली ?
(A) विठ्ठल रामजी शिंदे
(B) शाहू महाराज
(C) नारायण मेघाजी लोखंडे
(D) कृष्णाजी पांडुरंग भालेकर
Q.३२. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
(A) १८७१
(B) १८७२
(C) १८७३
(D) १८७४
Q.३३. महात्मा फुले यांनी ‘तकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ इसवी सन १८८३ त लिहिला; पण हा ग्रंथ इसवी सन १९६० पर्यंत प्रकाशित झालेला नव्हता.
(A) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(B) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
(C) संपूर्ण विधान बरोबर
(D) संपूर्ण विधान चूक
Q.३४. परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?
(A) दादोबा पांडुरंग तर्खडकर
(B) आत्माराम पांडुरंग तर्खडकर
(C) भास्कर पांडुरंग तर्खडकर
(D) वासुदेव बाबाजी नवरंगे
Q.३५. तुकारामतात्या पडवळ यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ?
(A) जातीभेदविवेकसार
(B) जातीभेद
(C) विटाळविध्वंसन
(D) अस्पृश्यतेचा प्रश्न
Q.३६. रा. रं. बोराडे आणि भास्कर चंदनशिव हे लेखक एकाच प्रादेशिक पर्यावरणातील आहेत; तथापि रा. रं. बोराडेंच्या लेखनातून प्रकट होणाऱ्या आशयसुत्रांपेक्षा चंदनशिव यांच्या साहित्यातील आशयसूत्रे वेगळी आढळतात.
(A) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(B) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
(C) संपूर्ण विधान बरोबर
(D) संपूर्ण विधान चूक
Q.३७. १८६५ साली मुंबईत विधवाविवाहोत्तेजकमंडळाची स्थापना कोणी केली होती ?
(A) गोपाळ हरि देशमुख, न्या. रानडे व विष्णुशास्त्री पंडित
(B) बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, विष्णुशास्त्री पंडित
(C) गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भाऊ महाजन
(D) तुकारामतात्या पडवळ, न्या. रानडे, न्या. तेलंग
Q.३८. भारतीय पातळीवरील अस्पृश्यतेचा प्रश्न मांडणारे पहिले समाजसुधारक कोण ?
(A) शाहू महाराज
(B) विठ्ठल रामजी शिंदे
(C) जोतीराव फुले
(D) तुकारामतात्या पडवळ
Q.३९. डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या ‘बहिष्कृत भारत’ या नियतकालिकातील अग्रलेखांचे संपादन कोणी केले?
(A) रत्नाकर गणवीर
(B) अरुण कांबळे
(C) वसंत मून
(D) चां. भ. खैरमोडे
Q.४०. स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदुत्वविषयक लेखांचे ‘हिंदुत्वदर्शन’ ह्या पुस्तकाचे संपादन कोणी केले ?
(A) विलास खोले
(B) प्र. न. जोशी
(C) भा. द. खेर
(D) द. न. गोखले
Q.४१. बसवेश्वरांच्या कल्याणक्रांतीवर आधारलेले गिरीश कर्नाड यांची नाट्यकृती कोणती ?
(A) शिरिसंपिगे
(B) तेलदंड
(C) हयवदन
(D) तुघलक
Q.४२. सतीश काळसेकर यांची ‘निशासुक्त’ ही दीर्घ कविता कोणत्या लघुनियतकालिकात प्रसिद्ध झाली ?
(A) असो
(B) टिंब
(C) येरू
(D) अ ब क ड ई
Q. ४३. ‘कवितारती’ या नियतकालिकाचे संपादक कोण ?
(A) गंगाधर पाटील
(B) म. सु. पाटील
(C) पुरुषोत्तम पाटील
(D) गो.तू.पाटील
Q.४४. प्रेमा कंटक यांच्या कादंबरीमधून कोणती विचारसरणी प्रकट होते ?
(A) गांधीवादी
(B) समाजवादी
(C) स्त्रीवादी
(D) मार्क्सवादी
Q.४५. ‘निषाद आणि शमा’ हे सदर कोणत्या नियतकालिकातून प्रकाशित झाले ?
(A) छंद
(B) अभिरुची
(C) युगवाणी
(D) प्रतिष्ठान
Q.४६. ‘कोसला ही फसलेली कादंबरी आहे’ हे विधान कोणाचे आहे ?
(A) विलास सारंग
(B) नरहर कुरुंदकर
(C) दिलीप चित्रे
(D) हरिश्चंद्र थोरात
Q.४७. ‘वज्राघात’ कादंबरीतील मेहेरजानच्या मुलाचे नाव काय ?
(A) रणदुल्लखान
(B) रणमस्तखान
(C) रामराजे
(D) राजाराम
Q.४८. ‘औदुंबर म्हणजे विरागी योग्याचे प्रतिक’ हा औदुंबर या कवितेचा अन्वयार्थ कोणी लावला आहे ?
(A) दि. के. बेडेकर
(B) वा. ल. कुलकर्णी
(C) व. दि. कुलकर्णी
(D) गो. म. कुलकर्णी
Q.४९. ‘धग’ या कादंबरीतील नायिकेचे नाव काय आहे?
(A) कौतिक
(B) पार्वती
(C) राधा
(D) लक्ष्मी
Q.५०. प्र. ई. सोनकांबळे यांचे आत्मकथनात्मक लेखन प्रथम कोणत्या नियतकालिकात प्रकाशित झाले ?
(A) अस्मितादर्श
(B) नवभारत
(C) अनुष्टुभ
(D) सत्यकथा
Q.५१. औपरोधिक स्वरुपाची विनोदनिर्मिती करणारे ‘संकासूर’ नावाचे पात्र कोणत्या प्रयोगरूप कला प्रकारामध्ये असते ?
(A) तमाशा
(B) दशावतार
(C) लळीत
(D) वरीलपैकी कोणतेही नाही
Q.५२. लोकसाहित्याभ्यासात लोकगीताच्या निर्मिती विषयीचा ‘समुदायवादी सिद्धांत’ कोणी मांडला ?
(A) जैकब ग्रिम
(B) बिशप पर्सी
(C) जेम्स चाइल्ड
(D) ए. डब्ल्यू. श्लेगेल
Q.५३. ‘बृहत्कथा’ या संग्रहातील कथांचे कर्तेपण कोणास दिले जाते ?
(A) सोमशर्मा
(B) गुणाढ्य
(C) सोमदेव
(D) बुद्धस्वामी
Q.५४. थिओडोर बेनेफ हा जसा प्राच्यविद्याविशारद होता, तसाच तो तौलनिक भाषाशास्त्राचा व्यासंगी अभ्यासक होता. मात्र तो लोकसाहित्याचा अभ्यासक नव्हता.
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) संपूर्ण विधान चूक
(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(D) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
Q.५५. ‘अपौरुषेय वाङ्मय’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
(A) कमलाबाई देशपांडे
(B) मालतीबाई देशपांडे
(C) सरोजिनी बाबर
(D) दुर्गा भागवत
Q.५६. ‘इंग्लिश अँड मराठी स्टायलीस्टिक आस्पेक्टस् ऑफ लिटररी ट्रान्सलेशन’ हा तौलनिक साहित्यात मोलाची भर घालणारा ग्रंथ कोणी लिहिला ?
(A) विलास सारंग
(B) दिलीप धोंडगे
(C) प्रकाश देशपांडे केजकर
(D) रमेश धोंगडे
Q.५७. शेक्सपिरीअन ‘प्रभावातून’ मराठी रंगभूमीवर आलेले पहिले शोकांत नाटक कोणते ?
(A) पुण्यप्रभाव
(B) थोरले माधवराव पेशवे
(C) जयपाळ
(D) कीचकवध
Q.५८. काम्युचा ‘कॅलिगुला’ या नाटकाचा अनुवाद चंद्र नभीचा ढळला’ या नावाने कोणी केला आहे ?
(A) चिं. त्र्यं. खानोलकर
(B) रत्नाकर मतकरी
(C) पुरुषोत्तम दारव्हेकर
(D) विद्याधर पुंडलिक
Q.५९. तौलनिक साहित्याभ्यासात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘आफ्टर अॅम्नेशिया’ या ग्रंथाचे कर्ते कोण ?
(A) गणेशदेवी
(B) रोमिला थापर
(C) मीनाक्षी मुखर्जी
(D) अमिया देव
Q.६०. ‘एन्कीच्या राज्यात’ या अस्तित्ववादी मानल्या जाणाऱ्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
(A) दिलीप चित्रे
(B) श्याम मनोहर
(C) भाऊ पाध्ये
(D) विलास सारंग
Q.६१. ‘सेकंड सेक्स’ या ग्रंथाचे मराठीमध्ये प्रथम भाषांतर कोणी केले आहे ?
(A) शांता किर्लोस्कर
(B) शांता गोखले
(C) शारदा साठे
(D) मुक्ता मनोहर
Q.६२. पुढीलपैकी कोणत्या कादंबरीवर स्त्रीवादाचा प्रभाव दिसून येतो ?
(A) पडझड
(B) रीटा वेलिणकर
(C) टिकलीएवढं तळं
(D) सुखदा
Q.६३. ‘मी बाई आहे म्हणून’ हा ग्रंथ कोणी संपादित केला आहे ?
(A) विमल मोरे
(B) विद्युत भागवत
(C) शारदा साठे
(D) छाया दातार
Q.६४. ‘भारतीय स्त्री जीवन’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
(A) विद्या बाळ
(B) प्रेमा कंटक
(C) गीता साने
(D) गोदावरी परुळेकर
Q.६५. ‘स्त्री प्रश्नांची चर्चा – एकोणिसावे शतक’ या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत ?
(A) प्रतिभा रानडे
(B) कमलाबाई रानडे
(C) विमल भालेराव
(D) तारा भवाळकर
Q.६६. ‘कथाकार शंकर पाटील’ हा ग्रंथ कोणाचा आहे?
(A) आनंद यादव
(B) मोहन पाटील
(C) नागनाथ कोत्तापल्ले
(D) वासुदेव मुलाटे
Q.६७. साखर कारखान्याच्या आगमनामुळे झालेल्या बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी कादंबरी कोणती ?
(A) शिदोरी
(B) पाचोळा
(C) धग
(D) गोतावळा
Q.६८. ‘लिगाड आणि खांदेपालट’ ही कलाकृती कोणाची आहे ?
(A) शंकर पाटील
(B) तानाजी पाटील
(C) आनंद पाटील
(D) मोहन पाटील
Q.६९. ‘हसले गं बी फसले’ हे वगनाट्य कोणी लिहिले आहे ?
(A) आनंद यादव
(B) रा. रं. बोराडे
(C) व्यंकटेश माडगुळकर
(D) वसंत सबनीस
Q.७०. ग. ल. ठोकळ संपादित ‘सुगी’ या काव्यसंग्रहाला कुणाची प्रस्तावना आहे ?
(A) वि. स. खांडेकर
(B) ना. गो. कालेलकर
(C) विभावरी शिरुरकर
(D) पु.ल. देशपांडे
Q.७१. माधव कोंडविलकर यांनी पुढीलपैकी कोणते आत्मकथन लिहिले आहे ?
(A) जातीला जात वैरी
(B) आठवणींचे पक्षी
(C) मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे
(D) रापी
Q.७२. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणते नियतकालिक चालवले?
(A) स्वराज्य
(B) प्रबुद्ध भारत
(C) दीनबंधू
(D) नवभारत
Q.७३. ’७२ मैल’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
(A) अशोक व्हटकर
(B) नामदेव व्हटकर
(C) नामदेव कांबळे
(D) अण्णाभाऊ साठे
Q.७४. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ हा समीक्षाग्रंथ कोणी लिहिला आहे ?
(A) शरणकुमार लिंबाळे
(B) यशवंत मनोहर
(C) केशव मेश्राम
(D) गंगाधर पानातारणे
Q.७५. पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह दया पवार यांचा आहे ?
(A) उत्थानगुंफा
(B) विद्रोहाचे पाणी पेटले आहे
(C) कोंडवाडा
(D) नागफणा आणि सूर्य