Q.१. भाषेच्या द्विस्तरीयतेशी संबंधित घटक कोणते ?
(A) शब्द आणि वाक्य
(B) भाषण आणि लेखन
(C) मुलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनिरचना
(D) भाषा आणि भाषण
Q.२. भाषिक वर्णन ही संकल्पना कोणी मंडळी आहे ?
(A) सोस्यूर
(B) ब्लूमफिल्ड
(C) वीटगेनस्टाइन
(D) जोन्स विल्यम
Q.३. ब-भ या स्वनिमांच्या निश्चितीसाठी पुढील कोणती जोडी उपयोगी आहे ?
(A) भाजी – बिजी
(B) वळ – बळ
(C) आबाळ – आभाळ
(D) बरा – भारा
Q.४. चौकटी कंस ही खूण काय दर्शवते ?
(A) स्वनांतरे
(B) पदिम
(C) रूपिका
(D) स्वनिम
Q.५. तेलंगणमधील आरे मराठी बोलीचा अभ्यास कोणी केला आहे ?
(A) सु. बा. कुलकर्णी
(B) श्री. रं. कुलकर्णी
(C) विजया चिटणीस
(D) ना. गो. कालेलकर
Q.६. ‘हळूहळू’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?
(A) तद्भव
(B) अभ्यस्त
(C) तत्सम
(D) आख्यात
Q.७. ‘टपाल’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आला आहे ?
(A) कन्नड
(B) फारसी
(C) अरबी
(D) तमिळ
Q.८. मराठी ही ‘क्रिओलाईज्ड प्राकृत’ आहे, असे कोणी म्हटले आहे ?
(A) ग्रिअरसन
(B) साऊथवर्थ
(C) यु. म. पठाण
(D) वि. का. राजवाडे
Q.९. चोंभा कवीचे ‘उखाहरण’ हे काव्य कोणत्या काव्यप्रकारात मोडते ?
(A) कथाकाव्य
(B) गीतकाव्य
(C) गीतिकाव्य
(D) चंपुकाव्य
Q.१०. ‘देशीकार लेणे’ हे कोणत्या ग्रंथास उद्देशून म्हटले जाते ?
(A) साती ग्रंथ
(B) ज्ञानेश्वरी
(C) अमृतानुभव
(D) गाथा
Q.११. महिपतीबुवा ताहराबादकर यांनी कोणता साहित्यप्रकार सर्वाधिक योजला आहे ?
(A) अभंग
(B) स्वयंवर काव्ये
(C) समश्लोकी टीका
(D) संतचरित्रे
Q.१२. गद्य – पद्य मिश्रित रचनेस काय म्हटले जाते ?
(A) स्तोत्र
(B) आर्या
(C) चम्पूकाव्य
(D) आरती
Q.१३. ‘नवनीत’ चे संपादन कोणी केले आहे ?
(A) कृष्णशास्त्री चिपळूणकर
(B) कृष्णशास्त्री कोल्हटकर
(C) परशुरामपंततात्या गोडबोले
(D) विष्णुशास्त्री चिपळूणकर
Q.१४. ‘बी’ कवींचे मुळनाव काय ?
(A) मुरलीधर नारायण गुप्ते
(B) नारायण मुरलीधर गुप्ते
(C) मुरलीधर वामन गुप्ते
(D) वामन मुरलीधर गुप्ते
Q.१५. पुढील जोड्या जुळवा आणि उचित पर्याय खाली दिलेल्या पर्यायामधून निवडा :
यादी (१)
(1) आनंदी गोपाळ
(2) तराळ-अंतराळ
(3) एक शून्य बाजीराव
(4) ब्राम्हणकन्या
यादी (२)
(5) श्री. व्यं. केतकर
(6) चि. त्र्यं. खानोलकर
(7) श्री. ज. जोशी
(8) शंकरराव खरात
(9) विजय तेंडूलकर
पर्याय :
(A) 1-9, 2-5, 3-6, 4-7
(B) 1-5, 2-6, 3-7, 4-8
(C) 1-6, 2-7, 3-8, 4-9
(D) 1-7, 2-8, 3-6, 4-5
Q.१६. ‘माझ्या मना बन दगड’ ही कविता कोणाची आहे ?
(A) बा. सी. मर्ढेकर
(B) नारायण सुर्वे
(C) विंदा करंदीकर
(D) केशव मेश्राम
Q.१७. ‘काळोखाचे अंग’ ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?
(A) श्री. ज. जोशी
(B) शं. बा. जोशी
(C) ए. वि. जोशी
(D) वसंत आबाजी उहाके
Q.१८. ‘बंध-अनुबंध’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ?
(A) कमल पाध्ये
(B) कांचन घाणेकर
(C) सुमा करंदीकर
(D) इंदिरा संत
Q.१९. ‘अभिरुची’ या नियतकालिकाचे प्रवर्तक कोण ?
(A) अनंत काणेकर
(B) पु. आ. चित्रे
(C) मं. वि. राजाध्यक्ष
(D) श्री पु. भागवत
Q.२०. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक कोण ?
(A) लक्ष्मणशास्त्री जोशी
(B) महादेवशास्त्री जोशी
(C) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
(D) रा. ग. जाधव
Q.२१. ‘कुळ, जाति, वर्ण | हे अवघेचि गा अकारण |’
हे उद्गार कोणाचे ?
(A) संत ज्ञानेश्वर
(B) संत नामदेव
(C) संत एकनाथ
(D) संत चोखामेळा
Q.२२.’पोवाडा’ या काव्याचे स्वरूप चंपूकाव्यासारखे आहे, असे कोणी म्हटले आहे ?
(A) अ. ना. देशपांडे
(B) वि. ल. भावे
(C) वि. का. राजवाडे
(D) ह. श्री. शेणोलीकर
Q.२३. ‘चांदण्यातील गप्पा’ हा कथासंग्रह कोणी लिहिला आहे ?
(A) प्रेमा कंटक
(B) काशीताई कानिटकर
(C) विभावरी शिरुरकर
(D) लीला पटवर्धन
Q.२४. ‘कलगी-तुरा’ या काव्यरचनेचे स्वरूप पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे असते ?
(A) शृंगारिक
(B) कारुण्यपूर्ण
(C) प्रबोधनात्मक
(D) आध्यात्मिक
Q.२५. ‘अनिरुद्ध पुनर्वसू’हे टोपणनाव कोणाचे आहे ?
(A) आ. रा. देशपांडे
(B) नारायण आठवले
(C) सेतूमाधवराव पगडी
(D) द. दि. पुंडे
Q.२६. ‘दुसरा पक्षी’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ?
(A) पु. शि. रेगे
(B) कुसुमाग्रज
(C) मंगेश पाडगावकर
(D) सदानंद रेगे
Q.२७. ‘थँक यू मिस्टर ग्लाड’ या कादंबरीचे लेखक कोण ?
(A) अरुण साधू
(B) दीनानाथ मनोहर
(C) अनिल बर्वे
(D) अच्युत बर्वे
Q.२८. ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने कोणी लेखन केले आहे ?
(A) सुभाष भेंडे
(B) अरुण टिकेकर
(C) जयवंत दळवी
(D) गोविंद तळवलकर
Q.२९. गो. नी. दांडेकरांनी पुढीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे ?
(A) हद्दपार
(B) जुईली
(C) महाद्वार
(D) मृण्मयी
Q.३०. पुढील जोड्या जुळवा आणि उचित पर्याय खाली दिलेल्या पर्यायामधून निवडा :
यादी (१)
(1) जर जाऊन येतो
(2) अंगणातील पोपट
(3) ग्यानबा, तुकाराम आणि टेक्निक
(4) अंतःकरणाचे रत्नदीप
यादी (२)
(5) विभावरी शिरुरकर
(6) य. गो. जोशी
(7) दिवाकर कृष्ण
(8) दि. बा. मोकाशी
(9) सहकारी कृष्ण
पर्याय :
(A) 1-8, 2-7, 3-6, 4-5
(B) 1-7, 2-6, 3-5, 4-8
(C) 1-6, 2-5, 3-7, 4-9
(D) 1-6, 2-7, 3-8, 4-9
Q.३१. ‘पर्व’ या कादंबरीचे मराठीत भाषांतर कोणी केले आहे ?
(A) उमा कुलकर्णी
(B) मीना वांगीकर
(C) मृणालिनी गडकरी
(D) लीना सोहोनी
Q.३२. ‘अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ मराठीमध्ये कोणी आणेल आहे ?
(A) ग. त्र्यं. देशपांडे
(B) गो. वि. करंदीकर
(C) र. पं. कंगले
(D) प्रभाकर पाध्ये
Q.३३. कन्नडमधील ‘जोकुमारस्वामी’ या नाटकाचा ‘पंचरंगी पोपटाचा तमाशा’ या नावाने अनुवाद कोणी केला आहे ?
(A) गिरीश कार्नाड
(B) उमा कुलकर्णी
(C) निशिकांत ठकार
(D) शं. बा. जोशी
Q.३४. ‘काव्यालोचन’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
(A) रा. श्री. जोग
(B) द. के. केळकर
(C) के. ना. वाटवे
(D) वा. के. लेले
Q.३५. व्युत्पत्तीला मम्मट कोणता शब्द वापरतो ?
(A) अभ्यास
(B) स्फूर्ती
(C) निपुणता
(D) निर्वेद
Q.३६. ‘वत्सल’ हा दहावा रस कोणी मानला आहे ?
(A) शोभाकरमित्र
(B) मधुसूदन सरस्वती
(C) मम्मट
(D) विश्वनाथ
Q.३७. ‘वक्रोक्ती’ हा काव्याचा आत्मा आहे, असे प्रतिपादन कोणी केले आहे ?
(A) कुंतक
(B) दंडी
(C) वामन
(D) आनंदवर्धन
Q.३८. पुढीलपैकी ध्वनितत्वाचा विरोधक कोण ?
(A) हेमचंद्र
(B) भामह
(C) महिमभट्ट
(D) रुद्रट
Q.३९. ‘देखणीसंबंधी’ हा ग्रंथ कोणत्या प्रकारच्या समीक्षेचे उदाहरण आहे ?
(A) तात्विक
(B) उपयोजित
(C) विरचनावादी
(D) स्त्रीवादी
Q.४०. उदात्ततेचा सिद्धांत कोणी मांडला आहे ?
(A) अॅरिस्टॉटल
(B) कांट
(C) क्रोचे
(D) लाँजायनस
Q.४१. संख्याशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा अवलंब पुढीलपैकी कोणत्या समीक्षापद्धतीत होतो ?
(A) शैलीवैज्ञानिक समीक्षा
(B) आदिबंधात्मक समीक्षा
(C) मानसशास्त्रीय समीक्षा
(D) चरित्रात्मक समीक्षा
Q.४२. ‘भरतमुनींचे नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
(A) मालतीबाई बेडेकर
(B) गोदावरी केतकर
(C) कुसुमावती देशपांडे
(D) दुर्गा भागवत
Q.४३. पुढीलपैकी जोड्या जुळवा आणि उचित पर्याय खाली दिलेल्या पर्यायामधून निवडा :
यादी (१)
(1) मराठी लेखिका : चिंता आणि चिंतन
(2) टीका आणि टीकाकार
(3) साहित्यातील संप्रदाय
(4) वैखरी
यादी (२)
(5) वा. भा. पाठक
(6) रा. शं. वाळिंबे
(7) अशोक केळकर
(8) भालचंद्र फडके
(9) भालचंद्र नेमाडे
पर्याय :
(A) 1-6, 2-9, 3-5, 4-8
(B) 1-7, 2-6, 3-5, 4-9
(C) 1-8, 2-5, 3-6, 4-7
(D) 1-5, 2-7, 3-6, 4-9
Q.४४. पुढीलपैकी अकरणरूप कोणते आहे ?
(A) होआवे
(B) न होआवे
(C) असो द्यावे
(D) कळावे
Q.४५. पुढीलपैकी कोणते रूप संयुक्त क्रियापद आहे ?
(A) अर्थात
(B) हरणे
(C) लिहित आहे
(D) हसलो
Q.४६. ‘दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?
(A) द्विगु
(B) कर्मधारय
(C) तत्पुरुष
(D) द्वंद्व
Q.४७. ‘शिक्षकांनी विद्यार्थ्याला व्याकरण शिकवले.’ – हे कोणत्या प्रकारच्या प्रयोगाचे उदाहरण आहे ?
(A) कर्तरी
(B) कर्मणी
(C) सकर्मक कर्तरी
(D) भावे
Q.४८. जाहिरातीच्या भाषेत पुढीलपैकी कोणता विशेष पायाभूत असतो ?
(A) आवाहन क्षमता
(B) लयबद्धता
(C) नाट्यात्मकता
(D) काव्यात्मकता
Q.४९. वृत्तलेखनात पुढीलपैकी काय अपेक्षित नसते ?
(A) वस्तुनिष्ठता
(B) नेमकी शब्दयोजना
(C) भावनाविष्कार
(D) यथातथ्यता
Q.५०. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहिताना कोणता मायना वापरावा ?
(A) प्रिय प्राचार्य
(B) माननीय प्राचार्य
(C) प्राचार्य
(D) माननीय प्रिय प्राचार्य
.jpg)