2017 MH-SET Marathi solved Paper 3

Adx
set paper 1 books in marathi pdf free download, set english syllabus, set syllabus for english, set exam syllabus english literature, set paper 1 study material pdf in marathi, set life science syllabus, सेट परीक्षा प्रश्नपत्रिका, set commerce syllabus, set exam mathematics syllabus pdf, set paper 1 books pdf free download, english set exam syllabus, library science question papers with answers pdf, set exam library science question papers with answers pdf, mh set paper 1 book pdf, set paper 1, set sociology syllabus, set syllabus life science, set computer science syllabus, set mathematics syllabus, set sanskrit question paper, set economics syllabus, library science set exam question paper in marathi, social work set exam question papers, set life science syllabus pdf, set paper 1 syllabus in marathi, set physics syllabus, set exam paper 1 books pdf, set syllabus for chemistry, set exam syllabus for physics pdf, set exam syllabus for computer science, set political science syllabus, set psychology syllabus, set exam syllabus for chemistry pdf,



Q.१. “ग्रंथु निका जाला असे: परि निवृत्ताजोगा नव्हेचि : हा श्रुंगारिया प्रवृत्ताजोगा जाला असे” असे परखड उद्गार कोणी व कोणाच्या ग्रंथाच्या संदर्भात काढले ?

(A) नागदेवाचार्यांनी नारायणबास विरचित ऋद्धीपूर वर्णनाच्या संदर्भात

(B) बाईदेवबासांनी भास्करभट्ट बोरीकरांच्या शिशुपालवधाच्या संदर्भात

(C) महदंबेने दामोदर पंडित विरचित वछाहरणाच्या संदर्भात

(D) म्हाईंभटाने विश्वनाथबासकृत ज्ञानप्रबोधनाच्या संदर्भात

 


Q.२. पुढीलपैकी कोणत्या कवीने ‘रुक्मिणी स्वयंवर’ लिहिले नाही ?

(A) नरेंद्र

(B) शिवरामशंकर किंकर

(C) सामराज

(D) एकनाथ

 


Q.३. नामदेवांच्या कवित्वाचा प्रभाव उत्तर भारतातील पुढीलपैकी कोणाच्या काव्यात दिसून येत नाही ?

(A) तुलसीदास

(B) मीरा

(C) नरसी मेहता

(D) कबीर

 


Q.४. पौराणिक आख्याने, जोहार, भारुड, गौळणी, अर्जदास्त इत्यादी वाङ्मयप्रकारांतून पुढीलपैकी कोणत्या संतांनी लेखन केले आहे ?

(A) ज्ञानेश्वर

(B) एकनाथ

(C) तुकाराम

(D) रामदास

 


Q.५. ‘गजेंद्रमोक्ष’ हे काव्य रचणारे कवी कोण ?

(A) नागेश

(B) आनंदतनय

(C) रघुनाथ पंडित

(D) विठ्ठल बीडकर

 

 

Q.६. ‘हृदयाला चटका लावते ती लावणी’ ही व्याख्या कोणी केली आहे ?

(A) म. वा. धोंड

(B) गं. ब. ग्रामोपाध्ये

(C) अ. ब. कोल्हटकर

(D) य. न. केळकर

 


Q.७. ‘निजामकालीन मराठवाड्यातील सरंजामी व्यवस्थेचे, हिंदू – मुस्लीम संबंधांचे व त्यातून आकाराला आलेल्या सामाजिक जीवन वास्तवाचे चित्रण करणारे लेखक कोण ?

(A) वि. सी. गुर्जर

(B) दि. बा. मोकाशी

(C) बी. रघुनाथ

(D) पु. भा. भावे

 


Q.८. “जिथे थांबला दिवस ! तिथे थांबलो मी नाही

कधी उसवले श्वास ! तरी विसावलो नाही “

कवितेच्या ह्या ओळी कोणत्या कवीच्या आहेत ?

(A) नामदेव ढसाळ

(B) यशवंत मनोहर

(C) अर्जुन डांगळे

(D) ज. वि. पवार

 


Q.९. चार – पाच हजार वर्षांचा रामायणकाळ ते डॉ. आंबेडकरांचा काळ इतका प्रदीर्घ कालावकाश सामावून घेणारे म. भि. चिटणीस यांचे नाटक कोणते ?

(A) युगविधान

(B) युगयात्रा

(C) कालचक्र

(D) समाजाचा विराटपुरुष

 


Q.१०. ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या साहित्यकृतीचा मुख्य विषय कोणता ?

(A) स्त्रीवादी साहित्याची चळवळ

(B) ग्रामीण साहित्याची चळवळ

(C) वारली आदिवासींचा जीवनसंघर्ष

(D) दलित साहित्याची चळवळ

 


Q.११. जी. ए. कुलकर्णी यांच्या विषयी ‘भोवऱ्यात सापडलेला प्रतिभावंत’ हे मत कोणी मांडले ?

(A) स. शि. भावे

(B) गंगाधर गाडगीळ

(C) भालचंद्र नेमाडे

(D) द. भी. कुलकर्णी

 


Q.१२. जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या पर्यायांमधून उचित पर्याय निवडा :

यादी १

(1) अर्थसंकोच

(2) अर्थविस्तार

(3) रूपकजन्य बदल

(4) अर्थापकर्ष

यादी २

(5) वेणा

(6) अपरोक्ष

(7) साला 

(8) दुधात साखर

(9) प्रवीण

पर्याय :

(1)   (2)   (3)   (4)

(A)    (8)   (5)   (7)   (9)

(B)    (5)   (9)   (8)   (7)

(C)    (5)   (9)   (6)   (7)

(D)    (9)   (8)   (5)   (6)

 


Q.१३. बहात्तर, बत्तीस, बेचाळीस, बावीस, ब्याऐंशी या संख्यावाचकांमधील ब-, बे-, बा-, ब्या- या घटकांचा परस्परसंबंध काय आहे ?

(A) स्वैर विनियोग

(B) पूरक विनियोग

(C) वैधर्म्ययुक्त विनियोग

(D) आशयबोधक

 


Q.१४. खंडयुक्त स्वनिमाच्या उच्चारण प्रक्रियेतच आणखी एखादा औच्चारिक गुणधर्म आरूढ होऊ शकतो, या सहोच्चारी गुणधर्मांना खंडाधिष्ठित स्वनिम म्हणतात. पुढीलपैकी कोणता एक सहोच्चारी गुणधर्म नाही ?

(A) नासिक्यरंजन

(B) बलाघात

(C) घर्षक

(D) सुरावली

 


Q.१५. पुढीलपैकी कोणती एक बोली खानदेशाची बोली नाही ?

(A) बागलाणी अहिराणी

(B) खानदेशी अहिराणी

(C) नंदुरबारी

(D) डांगी

 


Q.१६. वारली बोलीच्या क्षेत्रमर्यादेत पुढील कोणता भौगोलिक परिसर येत नाही ?

(A) ठाणे

(B) डहाणू

(C) छत्तीसगढ

(D) नाशिक


 

Q.१७. कोणत्याही काव्यशास्त्रज्ञाने काव्यलक्षणात समाविष्ट केलेले नसले तरी महत्वपूर्ण असलेले एक काव्यलक्षण पुढीलपैकी कोणते ?

(A) औचित्य

(B) चमत्कृती

(C) प्रतिभा

(D) अलंकार

 


Q.१८. ‘साहित्य’ हा शब्द कोणत्या साहित्यशास्त्रकाराने सांगितलेल्या काव्यलक्षणावरून आलेला आहे ?

(A) भामह

(B) दंडी

(C) वामन

(D) आनंदवर्धन

 


Q.१९. विश्वनाथाच्या ‘वाक्यं रसात्मकं काव्यम्’ या काव्यलक्षणावर तीव्र आक्षेप घेऊन त्या विरोधात स्वतःचे काव्यलक्षण कोणी ठासून सांगितले ?

(A) भोज

(B) जगन्नाथ

(C) अभिनवगुप्त

(D) अप्पय्य दीक्षित

  


Q.२०. भारतीय साहित्यशास्त्रातील रसविषयक विवेचनाला कोणत्या भारतीय तत्वज्ञानशाखेची बैठक लाभलेली आहे ?

(A) काश्मिरी शैव तत्वज्ञान

(B) बौद्ध तत्वज्ञान

(C) अद्वैत तत्वज्ञान

(D) विशिष्टाद्वैत तत्वज्ञान

 


Q.२१. संस्कृत साहित्य-नाट्यशास्त्रातील मर्मदृष्टीचे प्रभावी उपयोजन पुढीलपैकी कोणत्या समीक्षकाने केले आहे ?

(A) पुष्पा भावे

(B) के. नारायण काळे

(C) गो. के. भट

(D) श्री. ना. बनहट्टी

 

 

Q.२२. समीक्षेच्या भाषेचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे ?

(A) मिताक्षरी

(B) सुस्पष्टता

(C) सूचकता

(D) भावपूर्णता

 

 

Q.२३. ‘सर्वेक्षण’ या तंत्राचे उपयोजन कोणत्या समीक्षा-पद्धतीमध्ये करता येते ?

(A) समाजशास्त्रीय

(B) मानसशास्त्रीय

(C) रुपवादी

(D) आस्वादक

 

 

Q.२४. ‘शैलीमीमांसा’ ही संज्ञा कोणी प्रथम योजली आहे ?

(A) मिलिंद मालशे

(B) रमेश धोंगडे

(C) अशोक केळकर

(D) म. सु. पाटील

 

 

Q.२५. ‘जी. ए. कुलकर्णींच्या कथा वाचताना एखाद्या काळ्याशार खोल डोहात बुडी मारल्यासारखे वाटते’ हा अभिप्राय कोणत्या प्रकारच्या समीक्षेचे उदाहरण आहे ?

(A) रुपवादी

(B) आदिबंधात्मक

(C) चरित्रात्मक

(D) आस्वादक

 


Q.२६. ‘प्रस्तुत नाटकाची रचना व त्यातील अंकांची मांडणी आशयानुरूप केलेली नाही त्यामुळे नाट्यपरिणाम क्षीण होतो’ हा अभिप्राय कोणत्या प्रकारच्या समीक्षेचे उदाहरण आहे ?

(A) शैलीवैज्ञानिक

(B) मानसशास्त्रीय

(C) रुपवादी

(D) चरित्रात्मक

 

 

Q.२७. ‘पैस’ या शब्दाचा अर्थ काय आहे ?

(A) शर्यत

(B) अवकाश

(C) पैज

(D) पैसा

 

 

Q.२८. ग्रीस या देशात कोणत्या नाट्यप्रकारचा उगम झालेला आहे ?

(A) सुखात्मिका

(B) शोकान्तिका

(C) प्रहसन

(D) ओभनाट्य

 

 

Q.२९. ‘साहित्याच्या सर्व प्रकारांचे मूळ ऋतुकथांमध्ये (क्वेस्ट मिथ) मध्ये असते, असा सिद्धांत कोणी प्रतिपादन केला आहे ?

(A) सुसान लँगर

(B) जेम्स फ्रेझर

(C) नॉर्थोप फ्राय

(D) हर्बर्ट रीड

 

 

Q.३०. मिलिंद मालशे यांनी पुढीलपैकी कोणते मत मांडले ?

(A) प्रत्येक साहित्यिकाचे एक सत्व असून ते सार्वत्रिक व अपरिवर्तनीय स्वरूपाचे असते

(B) एक साहित्यिक करार दुसऱ्या साहित्यिक करारापेक्षा श्रेष्ठ असतो असे मानता येत नाही

(C) निर्मितीप्रक्रिया व आस्वादप्रक्रिया यांमध्ये साहित्यप्रकार नसतात

(D) प्रत्येक संस्कृतीचे उणे-अधिक स्वरूपातील वेगळे साहित्यप्रकार असतात.

 

 

Q.३१. आधुनिक काळात पुढीलपैकी कोणते साहित्यप्रकार मराठीत नव्याने निर्माण झाले आहेत ?

(A) विषण्ण सुखात्मिका (black comedy) आणि निरर्थवादी नाट्य (absured play)

(B) रोमँटिक शोकान्तिका आणि कादंबरी

(C) सुनित आणि विलापिका

(D) चरित्र आणि आत्मचरित्र


 

Q.३२. पाटउं साउला नसली असे: पाटाउं चोळी: कांकणें: कळाविया: सोनयांची तानवडें: भवंरिया भांगु: टिळ: नाकी मोती: जी: जी: ऐसी देखिली: जी: हे लीळेतील वर्णन कोणाचे आहे ?

(A) रुक्मिणी

(B) म्हाळसा

(C) साधे

(D) बाईइसा

 


 Q.३३. मुसलमानी राजवटीच्या काळात ब्राम्हण-क्षत्रियांना स्वधर्माची महती पटवून देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाची रचना झाली असावी ?

(A) विवेकसिंधू

(B) भैरवीटीका

(C) गुरुचरित्र

(D) तत्वचार

 


 Q.३४. राजा राम मोहन रॉय यांनी ‘ब्राम्होसमाजा’ची स्थापना केली, पण त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींविरोधात कोणतेही कार्य केले नाही ?

(A) उत्तरार्ध चूक पूर्वार्ध बरोबर

(B) संपूर्ण विधान चूक

(C) संपूर्ण विधान बरोबर

(D) उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक

 


 Q.३५. “मनुष्य व्यक्तिश: व समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवनसाफल्याचे स्वतःवर व बाह्यविश्वावर संस्कार करून अविष्कार करतो, ती पद्धती वा तो अविष्कार म्हणजे संस्कृती.”

ही संस्कृतीची व्याख्या कोणाची आहे ?

(A) प्रा. द. के. केळकर

(B) लक्ष्मणशास्त्री जोशी

(C) इरावती कर्वे

(D) दुर्गा भागवत

 

 

Q.३६. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’चे मूळ नाव काय होते ?

(A) लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे

(B) सोसायटी ऑफ बॉम्बे

(C) टाऊन हॉल

(D) रॉयल सोसायटी

 

 

Q.३७. ब्राम्हणाचे मुख्य कर्तव्य जे अध्ययन-अध्यापन ते त्यांनी बदललेल्या कळस अनुसरून कशा प्रकारे केले पाहिजे याचे विवेचन लोकहितवादींनी कोणत्या ग्रंथात केले आहे ?

(A) ‘आगम प्रकाश’

(B) ‘वेदोक्त धर्मप्रकाश’

(C) ‘स्वाध्याय’

(D) ‘ब्रम्हतत्व’

 

 

Q.३८. पुढीलपैकी कोणत्या गटातील स्त्रियांचे दुर्दैव हा ताराबाई शिंदे वैचारिक चिंतनाचा मुख्य विषय आहे ?

(A) विधवा

(B) एकत्र कुटुंबातील गृहिणी

(C) कुमारिका

(D) पितृप्रधान समाजव्यवस्थेतील सर्व स्त्रिया

 

 

Q.३९. “आसिं धुसिं धुपर्यंता यस्य भारतभूमिका पितृभू: पुण्यर्भूश्चैव” अशी हिंदूंची व्याख्या कोणी केली ?

(A) लोकमान्य टिळक

(B) वि. दा. सावरकर

(C) इतिहासाचार्य राजवाडे

(D) शं. दा. जावडेकर

 

 

Q.४०. गो.ग.आगरकर यांनी ‘सुधारक’ पत्र काढण्याचा हेती कोणाला सांगितला आहे?

(A) ‘बरोबर याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना’

(B) ‘बुडती हे जन न देखवे डोळां’

(C) ‘इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार’

(D) ‘आधी सामाजिक, मग राजकीय’



Q.४१. ‘भक्तिसाहित्याची चळवळ ही चळवळ होती असे म्हणता येणार नाही’ असे विधान कोणी केले आहे ?

(A) स्वपन मजुमदार

(B) शिशिरकुमार दास

(C) सुजित मुखर्जी

(D) मिनाक्षी मुखर्जी

  


Q.४२. ‘अभिरुची’या नियतकालिकाचे पहिले संपादक कोण ?

(A) दिलीप चित्रे

(B) पु.आ.चित्रे

(C) वि.पु. भागवत

(D) श्री.पु. भागवत

 

 

Q.४३. पहिले लघुनियतकालिक कोणते ?

(A) आम्ही

(B) असो

(C) शब्द

(D) अथर्व

 

 

Q.४४. संत तुकारामांचे अभंग नित्यपठणात समाविष्ट करणारा समाज कोणता ?

(A) सत्यशोधक समाज

(B) प्रार्थना समाज

(C) आर्य समाज

(D) ब्राम्हो समाज

 

 

Q.४५. म.फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा परमहंस सभेचे अध्यक्ष राम बाळकृष्ण यांना अर्पण केला आहे, मात्र या सभेची कार्यपद्धती त्यांना पसंत नव्हती.

(A) संपूर्ण विधान चूक

(B) पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक

(C) उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक

(D) संपूर्ण विधान बरोबर

 

 

Q.४६. विश्राम बेडेकरांच्या ‘रणांगण’ कादंबरीचे मुख्य आशयसूत्र कोणते ?

(A) चक्रधर आणि हॅर्टा यांची प्रेमकथा सांगणे

(B) बोटीतील जीवनाचे चित्रण करणे

(C) दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम सांगणे

(D) अत्याचारामुळे दुरावलेल्या, स्थैयाची शाश्वती नसलेल्या मानवी जीवनाचे व्यापक दर्शन घडविणे

 

 

Q.४७. मंगेश पाडगावकर यांच्या ‘सलाम’ या कविता-संग्रहाला १९८० साली कोणता पुरस्कार मिळाला ?

(A) सरस्वती सन्मान

(B) साहित्य अकादमी

(C) भैरुरतन दमाणी

(D) महाराष्ट्र फौन्डेशन

 

 

Q.४८. बाबुराव बागुलांच्या लेखनाचे कोणते महत्वाचे वैशिष्ट्य ‘सूड’ मध्ये आढळते ?

(A) उत्कट काव्यात्मक भाषाशैली

(B) लैंगिक जीवनाचे चित्रण

(C) वर्ण व्यवस्थेचे चित्रण

(D) झोपडपट्टीतील माणसांचे जगणे

 


Q.४९. ‘धग’ या कादंबरीचे वेगळेपण कोणते ?

(A) विदर्भातल्या ग्रामीण जीवनाचे प्रभाव चित्रण

(B) महादेवाचे आळसी असणे

(C) भीमा घरातून पळून जाते

(D) निसर्गचित्रण

 


Q.५०. ‘ताम्रपट’ या कादंबरीचे कथानक कोणत्या काळात घडते ?

(A) १९४७ ते १९८०

(B) १९४२ ते १९७९

(C) १९५० ते २०००

(D) १९६० ते १९८०

 


Q.५१ ‘पंचतंत्र’ या ग्रंथनिविष्ट परंपरेतील कथांचा करता कोण ?

(A) शिवदास

(B) वैजनाथ शर्मा

(C) बुद्ध घोष

(D) विष्णू शर्मा

 


Q.५२. लोककथांचे आशयानुसार आणि रचनानुसारी वर्गीकरण करणारा ब्लाडीमिर प्रॉप यांचा ग्रंथ कोणता ?

(A) द मार्फोलॉजी ऑफ फोकटेल

(B) द स्टडी ऑफ फोकटेल

(C) द फोकटेल

(D) इंडियन फोकलोअर

 


Q.५३. ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या योग्य जोड्या जुळवा :

यादी १

(1) प्राचीन भारतीय लोकधर्म

(2) लोकसाहित्य की भूमिका

(3) लोकसाहित्य विज्ञान

(4) लोकसाहित्य के प्रतिमान

यादी २

(5) सत्येंद्र

(6) कृष्णदेव उपध्याय

(7) उप्रेती कुंदनमल

(8) वासुदेवशरण अग्रवाल

(9) लक्षीनारायण लाल

पर्याय :

  (1)   (2)   (3)   (4)

(A)    (8)   (6)   (5)   (7)

(B)    (7)   (5)   (9)   (6)

(C)    (6)   (9)   (7)   (5)  

(D)    (5)   (8)   (6)   (9)

 


Q.५४. तुम्हारे देसो में लाडी हलदी का दुकार

हमारे देसो में लाडी हलदी का सुकार

तुम्हारे देसो में दुलेरा कुकू का दुकार

हमारे देसो में दुलेरा कुकू का दुकार

हे लोकगीत कोणत्या आदिवासी जमातीचे आहे ?

(A) बैगा

(B) गोंड

(C) परधान

(D) वारली

 


Q.५५. ‘नको जाऊ बाळा तू कलालीनच्या वई !

कलालीन चाफेकळी जानी तुझी रे कवई !!

नको जाऊ बाळा तू कलालीनचे देखा !

कलालीन अवदसा तुले टाकीन फासा !!

हे गीत कोणत्या प्रादेशिक बोलीतील आहे ?

(A) वऱ्हाडी

(B) कोकणी

(C) चंदगडी

(D) आदिवासी

 


Q.५६. तौलनिक साहित्यातील तुलनेचा उद्देश काय ?

(A) श्रेष्ठ-कनिष्ठ दर्जा ठरविणे

(B) साम्य स्थळांची यादी करणे

(C) समीक्षकाच्या स्वतःच्या आवडीनिवडीचे समर्थन करणे

(D) पृथगात्मता, प्रभाव आणि मूलस्त्रोत यांचा शोध घेणे

 


Q.५७. पुढीलपैकी कोणत्या पुस्तकात तौलनिक साहित्याचे उपयोजन, हे प्रमुख सुत्र आहे ?

(A) ‘भाषांतरमीमांसा’ - कल्याण काळे, अंजली सोमण

(B) ‘कवितेविषयी’ - वसंत बाबाजी डहाके

(C) ‘साहित्य : काही देशी, काही विदेशी’ - आनंद पाटील

(D) ‘ब्रिटिश बाँबे आणि पोर्तुगीज गोव्यातील वाङ्मय’ - आनंद पाटील

 


Q.५८. भारतामध्ये तौलनिक साहित्याचा श्रीगणेश कोणी केला ?

(A) बंकिमचंद्र चाटोपध्याय

(B) हरी नारायण आपटे

(C) रवींद्रनाथ ठाकूर

(D) अरविंद घोष

 


Q.५९. अनुकरण आणि प्रभाव यांच्या मध्ये असलेला प्रदेश कोणता ?

(A) रुपांतर (adaptation)

(B) भाषांतर (translation)

(C) स्वीकारप्रक्रिया (reception)

(D) आंतरसंहितात्मता (intertextuality)

 


Q.६०. वाङ्मयीन प्रभावाच्या रंगपटात एका टोकाला ‘अनुकरण’ असेल, तर दुसऱ्या टोकाला काय असते ?

(A) सहज साम्य (analogy)

(B) अर्धविकसित कल्पना रोखून धरणे (suppression)

(C) वाङ्मयचौर्यातीतता (metaplagiarism)

(D) बहुसांस्कृतिकता (multiculturalism)

 


Q.६१. ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपमुळे स्त्री-पुरुष संबंधात उत्पन्न होणारे प्रश्न पुढीलपैकी कोणत्या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत ?

(A) स्थलांतर

(B) आवर्तन

(C) मध्य लटपटीत

(D) सेतू

 


Q.६२. पुढीलपैकी कोणत्या नाटकाने ‘आई’ची रूढ प्रतिमा बदलली ?

(A) अखेरचा सवाल

(B) चारचौघी

(C) वाडा चिरेबंदी

(D) सावित्री

 


Q.६३. इंदिरा संत संपादित ‘मालनगाथा’ या संग्रहाचे स्वरूप कशाप्रकारचे आहे ?

(A) संशोधनात्मक

(B) कवितासंग्रह

(C) लोकगीतांचे मूल्यमापन

(D) लोकगीतांचे संकलन

 

Q.६४. ‘वन इज नॉट बॉर्न रादर बिकम्स अ वूमन’ हे विधान कोणी केले आहे ?

(A) सिमॉन द बोव्हा

(B) ज्युलियट मिशेल

(C) शोलमिथ फायरस्टोन

(D) मेरी कुलस्टोन क्राफ्ट

 


Q.६५. ‘द फेमिनाईन मिस्टिक’ या ग्रंथाची लेखिका कोण आहे ?

(A) जर्मेर ग्रीएर

(B) बेट्टी फ्रीडन

(C) सिमॉन द बोव्हा

(D) केट मिलेट

 


Q.६६. म. गांधीजींच्या हत्येनंतर ग्रामीण समाजाच्या बदललेल्या मानसिकतेचे आणि पडसादाचे चित्रण करणारी मराठीतील कादंबरी कोणती ?

(A) गांधारी

(B) रथचक्र

(C) वावटळ

(D) हद्दपार

 


Q.६७. ग्रामीण स्त्रीमन आणि स्त्रीमनातील भावसृष्टीचे चित्रण असलेल्या ‘भुजंग’, ‘वेणा’ या कथा पुढीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिल्या आहेत ?

(A) शंकर पाटील

(B) द. ता. भोसले

(C) बी. रघुनाथ

(D) उद्धव शेळके

 


Q.६८. ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या शोषणाचे वास्तव रेखाटणाऱ्या ‘तोडणी’, ‘खोडा’ या कथा कोणी लिहिल्या आहेत ?

(A) आनंद यादव

(B) रा. रं. बोराडे

(C) भास्कर चंदनशिव

(D) ना. धों. महानोर

 


Q.६९. वऱ्हाडी बोलीच्या सांस्कृतिक संदर्भासह समकालीन ग्रामीण जीवनवास्तवाचे रेखाटन असणारा कथासंग्रह कोणता ?

(A) हिरवे स्वप्न

(B) गावातल्या गोष्टी

(C) बोळवण

(D) खळाळ

 


Q.७०. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा संक्रमणावस्थेच्या काळातील मराठवाड्यातल्या गुंतागुंतीच्या ग्रामीण जीवनाचे रेखाटन करणारी कादंबरी कोणती ?

(A) गांधारी

(B) इंधन

(C) तहान

(D) पखाल

 


Q.७१. “दलितांच्या आत्मकथनांनी मराठी भाषेचा शब्द-संग्रह समृद्ध केला तसेच वेगवेगळ्या स्तरातील बोलींचे ऐश्वर्य वाढवले आहे/” हे विधान कोणत्या अभ्यासकाचे आहे ?

(A) आरती कुसरे कुलकर्णी

(B) वा. ल. कुलकर्णी

(C) अविनाश डोळस

(D) भालचंद्र फडके

 


Q.७२. “अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातीत जन्म घेतलेल्या लेखकांनी प्राक्त केलेल्या तदनुषंगिक जाणिवेला दलित जाणीव म्हणावे.” असे प्रतिपादन कोणी केले आहे ?

(A) प्रभाकर मांडे

(B) बाळकृष्ण कवठेकर

(C) गो. मा. पवार

(D) योगेंद्र मेश्राम

 


Q.७३. “ढोर ही कातडी कमवणारी, शेतीची अवजारे बनवणारी जात, स्वतःला श्रेष्ठ समजणारी जात. दुसरी चांभाराची, चपला पायताण बनवणारी, दुरुस्त करणारी, पायात घालून फिरलेल्या कातड्यांच्या चपलांना हात लावणारा म्हणून चांभारहीन, हलका असं ढोर मानायचे.”

दलितांमधील जातिअंतर्गत भेदाभेदांचे वरील चित्रण करणारी साहित्यकृती कोणती ?

(A) जातीला जात वैरी : ना. म. शिंदे

(B) हाडकी हाडवळा : नामदेव ढसाळ

(C) काळगर्भ : विजय शिरसाट

(D) अनाथ : माधव कोंडविलकर

 


Q.७४. बाबूराव बागूल हे केवळ मराठीतील एक श्रेष्ठ कथाकार नसून ते भारतीय साहित्यातील महत्वाचे कथाकार आहेत :

(A) संपूर्ण विधान बरोबर

(B) संपूर्ण विधान चूक

(C) विधानाचा पूर्वार्ध बरोबर

(D) विधानाचा उत्तरार्ध बरोबर

 


Q.७५. ‘जिणं आमुचं’ हे आत्मकथन कोणी लिहिले आहे ?

(A) शांताबाई कांबळे

(B) शांताबाई दाणी

(C) जनाबाई गिऱ्हे

(D) बेबी कांबळे


Post a Comment

Previous Post Next Post