2017 MH-SET Marathi solved Paper 2

Adx
set paper 1 books in marathi pdf free download, set english syllabus, set syllabus for english, set exam syllabus english literature, set paper 1 study material pdf in marathi, set life science syllabus, सेट परीक्षा प्रश्नपत्रिका, set commerce syllabus, set exam mathematics syllabus pdf, set paper 1 books pdf free download, english set exam syllabus, library science question papers with answers pdf, set exam library science question papers with answers pdf, mh set paper 1 book pdf, set paper 1, set sociology syllabus, set syllabus life science, set computer science syllabus, set mathematics syllabus, set sanskrit question paper, set economics syllabus, library science set exam question paper in marathi, social work set exam question papers, set life science syllabus pdf, set paper 1 syllabus in marathi, set physics syllabus, set exam paper 1 books pdf, set syllabus for chemistry, set exam syllabus for physics pdf, set exam syllabus for computer science, set political science syllabus, set psychology syllabus, set exam syllabus for chemistry pdf,



Q.1. ग्रिअर्सनच्या भारतीय भाषांच्या सर्वेक्षणाच्या कोणत्या खंडात मराठीच्या बोलीसंबंधी माहिती ग्रंथित केली आहे ?
(A) तिसऱ्या
(B) पाचव्या
(C) सहाव्या
(D) सातव्या
 

Q.2. ऐतिहासिकता, प्रामाण्य, जिवंतपणा व स्वायत्तता ही कोणत्या भाषेची सारतत्वे आहेत ?
(A) संगणकीय भाषा
(B) बोली भाषा
(C) प्रमाण भाषा
(D) एस.एम.एस.ची भाषा
 

Q.3. पुढीलपैकी भाषेचे सर्वात महत्वाचे रूप कोणते ?
(A) वाचणे
(B) ऐकणे
(C) बोलणे
(D) लिहिणे
 

Q.4. ‘महाप्राण मराठीत अर्थनिर्णायक आहे, इंग्रजीत नाही.’
(A) हे विधान बरोबर आहे
(B) हे विधान चूक आहे
(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(D) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
 

Q.5. फलाहार > फराळ, हे स्वनपरिवर्तन कोणत्या प्रक्रियेचे उदाहरण आहे ?
(A) सदृशीकरण
(B) विसदृशीकरण
(C) स्वनव्यत्यास
(D) सदृशस्वनलोप
 
 
Q.6. मराठी भाषेच्या निर्मितीचा विचार करताना ‘क्रिओलाईझ प्राकृत’ असा मराठीचा निर्देश कोणी केला आहे ?
(A) साउथवर्थ
(B) अ. म. घाटगे
(C) चिं. वि. वैद्य
(D) व्हेर्नर
 
 
Q.7. संयुक्त क्रियापदे अपभ्रंशात नाहीत, मराठीने ती स्वतंत्रपणे बनवलेली आहेत.
(A) हे विधान बरोबर आहे
(B) हे विधान चूक आहे
(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(D) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
 
 
Q.8. ‘संस्कृत, ग्रीक व लॅटीन या भाषांमध्ये खोलवर रुजलेले व घनिष्ठ समस्या आहे’ असे म्हणून त्याचा खुलासा सर विल्यम जोन्स यांनी कोणत्या वर्षी केला ?
(A) १७८६
(B) १८७६
(C) १७६८
(D) १६७८
 

Q.9. पुढीलपैकी कोणत्या एका चिन्हाने दिग्दर्शित होणारी ध्वनी मराठी भाषेत वापरत नाहीत ?
(A)
(B) लृ
(C) त्र
(D) ङ्
 
 
Q.10. पुढील शब्दांमधला कोणता शब्द लेखननियमांनुसार अचूक आहे ?
(A) आशीर्वाद
(B) आशिर्वाद
(C) आर्शिवाद
(D) आर्शीवाद
 
 
Q.11. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द लेखननियमांनुसार अचूक आहे ?
(A) पुनर्निर्मिती
(B) पुर्नर्निमिती
(C) पुनर्निमिति
(D) पुननिर्मिती
 
 
Q.12. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द लेखननियमांनुसार अचूक आहे ?
(A) निःसर्गतच
(B) निसर्गताच
(C) निसर्गतःच
(D) निर्सगतःच
 
 
Q.13. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरांची स्थापना शके ११११ मध्ये झाली, असा पुरावा देणारा शिलालेख कोणता ?
(A) चौऱ्याएंशीचा शिलालेख
(B) पंढरपूरचा शिलालेख
(C) पळसदेव शिलालेख
(D) मंगळवेढयाचा शिलालेख
 

Q.14. महदंबेचे ‘मातृकी रुक्मिणी स्वयंवर’ हे दीर्घकाव्य ‘धवळ्या’च्या तुलनेत काव्यदृष्ट्या अधिक सरस असले तरी या कथाकाव्याची भक्तीरसाची बैठक मात्र डळमळीत आहे’
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) संपूर्ण विधान चूक
(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(D) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
 
 
Q.15. भास्करभट्ट बोरीकरांच्या ‘शिशुपाळवध’ या काव्याविषयी ‘ग्रंथु निका झाला/ परि निवृत्ताजोगा नव्हेचि:’ असा अभिप्राय कोणी व्यक्त केला ?
(A) नागदेवाचार्य
(B) चक्रधरस्वामी
(C) कवीश्वर बांस
(D) बाईदेवी बांस
 

Q.16. भागवत धर्माचे प्रथम संघटक व प्रचारक कोण ?
(A) ज्ञानेश्वर
(B) नामदेव
(C) निवृत्तीनाथ
(D) चांगदेव
 
 
Q.17. ‘भिंगांचे भिंगुले खांद्यावर अंगुले I नाचत तान्हुले यशोदेचे II’
ही रचना कोणत्या संत कवीची आहे ?
(A) संत नामदेव
(B) संत तुकाराम
(C) संत एकनाथ
(D) संत मुक्ताबाई
 

Q.18. ‘माझी मराठी भाषा चोखडी I परब्रम्हे फळली मोठी’ असा मराठी भाषेचा गौरव कोणी केला ?
(A) ज्ञानेश्वर
(B) एकनाथ
(C) तुकाराम
(D) रामदास
 
 
Q.19. ’पुण्य परउपकार पाप ते परपीडा I आणीक नाही जोडा दुजा यासी’ ही रचना कोणत्या संताची आहे ?
(A) संत नामदेव
(B) संत एकनाथ
(C) संत जनाबाई
(D) संत तुकाराम
 

Q.20. “तरुणी-शिक्षण नाटिका’ या नाटकातून ना.बा. कानिटकर यांनी स्त्रीशिक्षण व स्त्रीस्वातंत्र्य याविषयी १९व्या शतकातील रुढीप्रिय परंपरावादी वृत्तीच्या मध्यमवर्गीयांची प्रातिनिधिक विचारसरणी मांडली आहे. केसरीचे तत्कालीन संपादक बाळ गंगाधर टिळक याच विचारांचे पुरस्कर्ते होते.
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) संपूर्ण विधान चूक
(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(D) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
 

 
Q.21. ‘बदलत्या काळाप्रमाणे शास्त्रालाही चालन राहिले पाहिजे’ हे मत कोणी मांडले ?
(A) लोकहितवादी
(B) विष्णुशास्त्री पंडित
(C) गोपाळ गणेश आगरकर
(D) न्यायमूर्ती रानडे
 
 
Q.22. ह.ना.आपटे यांच्या कोणत्या कादंबरीत इंग्रजी चालीरीतींचे मध्यमवर्गीयांवर झालेल्या परिणामांचे चित्रण आले आहे ?
(A) ‘मी’
(B) ‘मधली स्थिती’
(C) ‘सूर्योदय’
(D) ‘पण लक्षात कोण घेतो?’
 
 
Q.23. ‘बळी’ या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा कोणती ?’
(A) तात्या
(B) आबा
(C) बापू
(D) नाना
 

Q.24. मराठीतील निवडक कादंबऱ्यांचा परामर्श घेणारा नरहर कुरुंदकरांचा ग्रंथ कोणता ?
(A) रूपवेध
(B) भजन
(C) धार आणि काठ
(D) शिवरात्र
 
 
Q.25. कोणत्या वाङ्मय प्रकारातील ग्रंथांचे अनुवाद मराठीमध्ये सर्वाधिक झालेले आहेत ?
(A) कथा
(B) कादंबरी
(C) कविता
(D) आत्मचरित्र


Q.26. मराठीमध्ये सर्वात जास्त प्रती कोणत्या अनुवादित ग्रंथाच्या निघाल्या ?
(A) गीताई – विनोबा भावे
(B) गीतांजली – रवींद्रनाथ ठाकूर
(C) तृणपर्णे – सदानंद रेगे
(D) पँट घातलेला ढग – ब्लादीमीर मायकोव्हस्की
 
 
Q.27. पुढीलपैकी कोणता अनुवाद विंदा करंदीकर यांनी केलेला नाही ?
(A) अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र
(B) फाऊस्ट : भाग पहिला – गटे
(C) राजा लियर – शेक्सपिअर
(D) वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड – गॅब्रियल गार्सिया मार्क्वेझ
 

Q.28. मराठीमध्ये सर्वात जास्त अनुवादित झालेला कादंबरीकर कोणता ?
(A) जेम्स हॅडली चेस
(B) सिडने शेल्डन
(C) अॅगाथा ख्रिस्ती
(D) इयान फ्लेमिंग
 
 
Q.29. अनुवादित कादंबऱ्यांतील व्यक्तिरेखा आणि त्यांचे मूळ लेखक यांच्या योग्य जोड्या लावा :
यादी (अ)
(1) हर्क्युल पायरो  
(2) जेम्स बॉंड   
(3) पेरी मॅसन              
(4) हॅरी पॉटर              
                                
यादी (ब)
(5इयान फ्लेमिंग
(6अर्ल स्टेनले गार्डनर
(7जे. के. रोलिंग
(8अॅगाथा ख्रिस्ती
(9सिडने शेल्डन
पर्याय :
(A) (1)-(7), (2)-(3), (3)-(5), (4)-(8)
(B) (1)-(8), (2)-(5), (3)-(6), (4)-(7)
(C) (1)-(9), (2)-(7), (3)-(8), (4)-(6)
(D) (1)-(6), (2)-(8), (3)-(9), (4)-(5)
 
 
Q.30. काव्यलक्षणासंबंधी संस्कृत साहित्य शास्त्रकारांनी केलेल्या विवादाचे कारण कोणते होते ?
(A) काव्यलक्षणाची शास्त्रशुद्ध उपपत्ती मांडण्याचा आटापिटा
(B) स्वतःच्या बुद्धिवैभवाचा गर्व
(C) दुसऱ्या साहित्यशास्त्रकाराविषयीचा मत्सर
(D) वादविवादाची हौस
 

Q.31. मम्मटाने सांगितलेल्या काव्यप्रयोजनांपैकी संपूर्णतः कालबाह्य झालेले काव्यप्रयोजन कोणते ?
(A) यशःप्राप्ती
(B) अर्थप्राप्ती
(C) शिवेतरक्षति
(D) व्यवहारविद
 
 
Q.32. प्रतिभाशक्तीचे कोणते दोन प्रकार अभिनव गुप्ताने मानलेले आहेत ?
(A) चल प्रतिभा व अचल प्रतिभा
(B) कारयित्री प्रतिभा व भारयीत्री प्रतिभा
(C) नवनिर्माणक्षम प्रतिभा व पुनर्निर्मितीक्षमता प्रतिभा
(D) कलाधिष्ठित प्रतिभा व शास्त्राधिष्ठित प्रतिभा
 

Q.33. ‘अपूर्ववस्तूनिर्माणक्षमा प्रज्ञा प्रतिभा’ या वाचनातील ‘वस्तू’ या शब्दाचा अर्थ काय ?
(A) पदार्थ
(B) नवनिर्मिती
(C) व्यक्तिरेखा
(D) काव्याचे आशयसूत्र
 
 
Q.34. श्रीशंकुकाच्या उपपत्तीनुसार रसाभिव्यक्तीचा मुख्य घटक कोणता ?
(A) अनुकरण
(B) साधारणीकरण
(C) स्थायीभाव जागृती
(D) कल्पना

 
Q.35. पोट बिघडलेले असते तेव्हा कविता वाचण्याकडे लक्ष लागत नाही, यामध्ये कोणते रसविघ्न आढळून येते ?
(A) विभववैकल्य
(B) प्रतीतिवैकल्य
(C) निजसुखा दिविवशीभाव
(D) पूर्वग्रह निर्धारण
 
 
Q.36. ‘साहित्यकृती ही स्वायत्त व स्वयंपूर्ण वस्तू आहे’ ही भूमिका कोणत्या समीक्षापद्धतीस आधारभूत आहे ?
(A) जीवनवादी
(B) रुपवादी
(C) अस्तित्ववादी
(D) आदिबंधात्मक
 
 
Q.37. ‘द आर्किटाइप्स ऑफ लिटरेचर’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
(A) मॉड बॉडकिन
(B) जेम्स फ्रेझर
(C) नॉर्थोप फ्राय
(D) सी.जि. युंग
 
 
Q.38. मराठीमध्ये ‘कथनमीमांसा’ हा दीर्घ लेख कोणी लिहिला आहे ?
(A) म.सु. पाटील
(B) गंगाधर पाटील
(C) मिलिंद मालशे
(D) वसंत पाटणकर
 
 
Q.39. ‘पोत’ ही संकल्पना कोणी मांडली आहे ?
(A) द.ग. गोडसे
(B) बा.सी. मर्ढेकर
(C) दि.के. बेडेकर
(D) माधव आचवल
 
 
Q.40. ‘वाङ्मयीन महात्मता’ ही संकल्पना कोणी मंडळी आहे ?
(A) मे.पुं. रेगे
(B) रा.भा. पाटणकर
(C) बा.सी. मर्ढेकर
(D) प्रभाकर पाध्ये
 
 
Q.41. ‘जीवनानुभव, हे एखाद्या तुरुंगातील अनुभवांसारखे असतात’ असा दृष्टांत पुढीलपैकी कोणी दिला आहे ?
(A) सिग्मंड फ्रॉइड
(B) युंग
(C) फुको
(D) बाख्तिन
 
 
Q.42. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रथमपुरुषवाचक सर्वनाम आहे ?
(A) तो
(B) आम्ही
(C) ते
(D) त्या
 
 
Q.43. नामास लागणाऱ्या चरमप्रत्ययांच्या वर्गास विभक्ती असे म्हणतात, तर धातूस लागणाऱ्या चरमप्रत्ययांच्या वर्गास आख्यात असे म्हटले जाते.
(A) संपूर्ण विधान चूक
(B) संपूर्ण विधान बरोबर
(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
(D) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
 
 
Q.44. आख्यातार्थ व्यक्त करण्याचे कार्य जसे प्रत्यय करतात, तसे कार्य संयुक्त क्रियापदासारखे शब्दही करतात.
(A) संपूर्ण विधान चूक
(B) संपूर्ण विधान बरोबर
(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
(D) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
 
 
Q.45. संयुक्त क्रियापदे हा मराठीतील एक विवाद्य प्रश्न असून ती इंग्रजीच्या द्वारा लॅटिनमधून आली आहेत.
(A) संपूर्ण विधान चूक
(B) संपूर्ण विधान बरोबर
(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
(D) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
 
 
Q.46. क्रियापदाला संस्कृतमध्ये काय म्हणतात ?
(A) आख्यात
(B) विभक्ती
(C) कृदंत
(D) धातू
 

Q.47. जाहिरात ही कला कोणत्या प्रकारची मानली जाते ?
(A) दृक-श्राव्य
(B) विशुद्ध
(C) उपयोजित
(D) प्रयोगजीवी
 
 
Q.48. जाहिरातीच्या मथळ्याचे प्रमुख वैशिष्ट्ये कोणते आहे ?
(A) आनंदजनक
(B) कुतूहलजनक
(C) रोमांचकारक
(D) माहितीपर
 
 
Q.49. उत्पादित वस्तूच्या जाहिरातीमध्ये पुढीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो ?
(A) बोधचिन्ह
(B) काव्य
(C) संगीत
(D) संवाद
 
 
Q.50. पत्रलेखनातील ‘प्रति’ या शब्दाने कशाचा बोध होतो ?
(A) ज्याने पत्र पाठवले आहे त्याचा
(B) ज्याला पत्र पाठवले आहे त्याचा
(C) पाठवणाऱ्याचा पत्ता
(D) ज्याठिकाणी पत्र पाठवायचे तेथील पत्ता



Post a Comment

Previous Post Next Post