2018 MH-SET Marathi solved Paper 3

Adx
set paper 1 books in marathi pdf free download, set english syllabus, set syllabus for english, set exam syllabus english literature, set paper 1 study material pdf in marathi, set life science syllabus, सेट परीक्षा प्रश्नपत्रिका, set commerce syllabus, set exam mathematics syllabus pdf, set paper 1 books pdf free download, english set exam syllabus, library science question papers with answers pdf, set exam library science question papers with answers pdf, mh set paper 1 book pdf, set paper 1, set sociology syllabus, set syllabus life science, set computer science syllabus, set mathematics syllabus, set sanskrit question paper, set economics syllabus, library science set exam question paper in marathi, social work set exam question papers, set life science syllabus pdf, set paper 1 syllabus in marathi, set physics syllabus, set exam paper 1 books pdf, set syllabus for chemistry, set exam syllabus for physics pdf, set exam syllabus for computer science, set political science syllabus, set psychology syllabus, set exam syllabus for chemistry pdf,


Q.1. नागदेवाचार्यांच्या वचनांना काय म्हणतात ?

(A) सूत्रपाठ

(B) स्मृती

(C) श्रुती

(D) वचनामृत



Q.2. बाईदेवबासांनी 'ग्रंथुनिका जाला असे : परि निवृत्ताजोगा नव्हेच' हे उद्गार कोणत्या ग्रंथासंदर्भात काढले आहेत ?

(A) ऋद्धिपूरवर्णन

(B) शिशुपालवध

(C) वछाहरण

(D) ज्ञानप्रबोध



Q.3. 'सकळा' लिपीचे जनकत्त्व पुढीलपैकी कोणाकडे जाते ?

(A) हरिबास

(B) खळोबास

(C) भटोबास

(D) करणाधिप हेमाद्री



Q.4. 'ज्ञानदेवांचा अक्षरदेह म्हणजे 'ज्ञानेश्वरी' आहे.' हे उद्गार कोणाचे आहेत ?

(A) गुरुदेव रानडे

(B) विनोबा भावे

(C) ल.रा. पांगारकर

(D) वि.ल. भावे



Q.5. 'पंजाबातील नामदेव' हे पुस्तक कोणी लिहिले ?

(A) शं. पु. जोशी

(B) अशोक कामत

(C) अ.ना. देशपांडे

(D) ल.रा. पांगारकर



Q.6. "सकाळीं उठोनि ऐकतो कीर्तन। तेणे समाधान मज होय" हे उद्गार कोणाचे ?

(A) तुकाराम

(B) नामदेव

(C) रामदास

(D) सावता माळी



Q.7. 'टळटळित दुपारी जन्मला रामराणा,

म्हणुनि सकळगाती ठाउके हे पुराणा |

दशरथगृहमायां सूर्य आला अहो तो

कुलतिलक पहाया तोंचि माध्यान्ह होतो ||

कीर्तनप्रसंगी हटकून वापरला जाणारा उपरोक्त श्लोक कोणत्या पंडित कवीचा आहे ?

(A) नरेंद्र

(B) जयरामस्वामी वडगावकर

(C) वरद नागेश

(D) वामन पंडित



Q.8. इंग्रजांच्या धोरणांचा परखड समाचार घेण्यासाठी म. फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

(A) ख्रिस्ती बंधुजनांस विनंती

(B) इशारा

(C) सार्वजनिक सत्यधर्म

(D) तृतीय रत्न



Q.9. वि. का. राजवाडे यांनी श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर कोठे स्थापन केले ?

(A) नागपूर

(B) नांदेड

(C) सातारा

(D) धुळे



Q.10. 'रे. बाबा पद्यमनजी म्हणजे मराठी-ख्रिस्ती सारस्वताचे जनक होत. त्यांच्या हातून बनलेली मराठी पुस्तके वजा केली तर आज मराठी-ख्रिस्ती वाङ्मय असून नसल्यासारखे होईल.' हे उद्गार कोणाचे आहेत ?

(A) ना. वा. टिळक

(B) भास्कर दामोदर पाळंदे

(C) फादर फ्रान्सिस दीब्रिटो

(D) विश्वनाथ नारायण मॅडलिक



Q.11. ‘टेनिसन्’ च्या ‘प्रिन्सेस' ची अनुकृती 'इंदिरा' हे दीर्घकाव्य कोणी रचले आहे ?

(A) विनायक ओक

(B) कान्होबा. कीर्तीकर

(C) पांडुरंग चिंतामणी पेठकर

(D) म.मो. कुंटे



Q.12. एका सरकारी अधिकाऱ्याची कैफियत मांडणारी 'शिरस्तेदार' ही कादंबरी कोणी लिहिली ?

(A) ना.ह. आपटे

(B) ह.ना. आपटे

(C) वि.कों. ओक

(D) म.वि. रहाळकर



Q.13. काळाच्या ओघात संस्कृतपेक्षा मराठीत बदल झाले व नव्या भाषिक रचना निर्माण झाल्या.

पुढीलपैकी एक घटक मात्र मराठीचे वैशिष्ट्य नव्हे.

(A) भूतकाळवाचक धातुसाधिते

(B) नामांची प्रत्ययपूर्व सामान्यरूपे

(C) अंतःश्वसित स्वन

(D) प्रत्ययी विभक्तिरूपे



Q.14. मराठी भाषेवर पुढीलपैकी कोणत्या भाषेचा परिणाम झालेला नाही ?

(A) पोर्तुगीज

(B) तामिळ

(C) फारसी

(D) राजस्थानी



Q.15. पुढीलपैकी कोणता स्वन कंठद्वारीय आहे ?

(A) ख

(B)

(C) य

(D) द



Q.16. 'भाषेतील अर्थयुक्त लघुतम ध्वनिगट' असे/ कशाला म्हटले आहे ?

(A) वाक्य

(B) पदिम

(C) स्वनिम

(D) स्वनांतर



Q.17. 'ऐतिहासिक भाषाविज्ञान आणि एककालिक वर्णनात्मक भाषाविज्ञान यांचे स्वरूप, उद्दिष्ट आणि कार्यपद्धती यांबाबतीतील वेगळेपणा दाखवून एककालिक भाषाविज्ञानाचे महत्त्व पटवून दिले' हे कार्य पुढीलपैकी कोणी केले ?

(A) सोस्यूर

(B) ब्लूमफील्ड

(C) चॉम्स्की

(D) हॉकेट



 Q18.मम्मटाने सांगितलेल्या काव्ययोजनांपैकी कोणत्या दोन प्रयोजनांचा विस्तार पुढे 'कलेसाठी कला' आणि 'जीवनासाठी कला' या वादात झालेला दिसतो ?

(A) 'यशसे' व 'व्यवहारविदे'

(B) 'व्यवहारविदे' व 'शिवेतरक्षतये'

(C) 'सद्यः परानिर्वृतये' व 'कांतासम्मिततयो-पदेशयुजे'

(D) 'अर्थकृते' व 'यशसे'



Q.19. 'अपूर्व वस्तुनिर्माणक्षमा प्रज्ञा प्रतिभा" या वचनातील 'प्रज्ञा' या शब्दाची अर्थकक्षा पुढीलपैकी कोणती आहे ?

(A) कल्पनाविलास करणारी बुद्धी

(B) भूत-वर्तमान-भविष्य यांचा वेध घेणारी बुद्धी

(C) सारासारविवेक

(D) विचारशक्ती



Q.20. "संस्कृत साहित्यशास्त्रानुसार, प्रतिभा ही ईश्वरदत्त शक्ती आहे, म्हणून तिचे विश्लेषण करता येणे, शक्य नाही. (A) वरील विधान पूर्णपणे असत्य आहे

(B) वरील विधान पूर्णतः सत्य आहे

(C) वरील विधानाचा पूर्वार्ध सत्य आहे, परंतु उत्तरार्ध असत्य आहे

(D) वरील विधानाचा पूर्वार्ध सत्य नाही, परंतु उत्तरार्ध असत्य आहे



Q.21. ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या योग्य जोड्या जुळवा :

ग्रंथ

(1) प्राचीन भारतीय लोकधर्म

(2) लोकसाहित्य की भूमिका

(3) लोकसाहित्य विज्ञान

(4) लोकसाहित्य के प्रतिमान

ग्रंथकार

(5) सत्येंद्र

(6) कृष्णदेव उपाध्याय

(7) उप्रेती कुंदनमल

(8) वासुदेवशरण अग्रवाल

(9) लक्ष्मीनारायण लाल

पर्याय :

       (1)  (2)  (3)  (4)

(A)  (8)  (6)  (5)  (7)

(B)  (7)  (5)  (9)  (6)

(C)  (6)  (9)  (7)  (5)

(D)  (5)  (8)  (6)  (9)



Q.22. वाङ्मयीन आत्मनिष्ठेचे व तादात्म्याचे विवेचन करताना आत्मिक अनुभव, त्याच्या बारीकसारीक अर्थच्छटांसह व अंगभूत सुसंगतीसह शब्दबद्ध करणे म्हणजे कविता लिहिणे अशी त्यांनी काव्यलेखनविषयक कल्पना गृहीत धरली आहे, असे सुधीर रसाळांनी कोणाविषयी म्हटले आहे ?

(A) पुरुषोत्तम शिवराम रेगे

(B) बाळ सीताराम मर्ढेकर

(C) शरच्चन्द्र मुक्तिबोध

(D) विंदा करंदीकर



Q.23. "कवी आपले व्यक्तिमत्त्व किंवा भावना अभिव्यक्त करीत नाही तर तो त्यापासून मुक्तता मिळवतो" असे कोणी म्हटले आहे ?

(A) सॅम्युएल टेलर कोलरिज

(B) टी.एस. एलिएट

(C) सिग्मंड फ्रॉइड

(D) कार्ल गुस्ताव युंग



Q.24. 'कथेतील निवेदकामागे जो तथागत लेखक असतो तो लौकिक लेखकाहून वेगळा असतो कारण वेगळ्या मूल्यांचा पुरस्कार करणारा लौकिक लेखक कथागत लेखक म्हणून कथनात्म लेखन करताना कथेगणिक वेगवेगळी मूल्यदृष्टी, विचारप्रणाली, कलादृष्टी व भूमिका घेत असतो" हे मत कोणाचे ?

(A) गंगाधर गाडगीळ

(B) गंगाधर पाटील

(C) शरच्चन्द्र मुक्तिबोध

(D) प्रह्लाद वडेर



Q.25. साहित्यप्रकाराविषयीची एकसत्त्ववादी भूमिका पाश्चात्य साहित्यपरंपरेतील कोणत्या वैचारिक संकल्पनेत स्पष्टपणे दिसून येते ?

(A) लेखनातील अस्थिरता व परिवर्तनीयता

(B) लेखनातील विशुद्धता व श्रेणिबद्धता

(C) लेखनविषयक क्षमता

(D) लेखनातील अनुभवाची जात



Q.26. साहित्य प्रकारांविषयीच्या एकसत्त्ववादी भूमिकेचा एक विशेष म्हणजे :

(A) साहित्यप्रकारांची तरतमव्यवस्था (श्रेणि- व्यवस्था) असते

(B) कलासाहित्याच्या क्षेत्रात वर्गीकरण, प्रकारव्यवस्था संभवत नाही

(C) साहित्यकृतीतील निवेदनात जो काळ वापरला जातो, तो त्या त्या प्रकाराचे स्वरूप निश्चित करतो

(D) मानवी जीवनचित्रणातील जन्म - तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व व मरण या चार जीवनव्यवस्था अनुक्रमे वसंतकाल, ग्रीष्मकाल, शरद व हिंवाळा ह्या चार ऋतूंच्या मिथ्समधून व्यक्त झालेल्या दिसून येतात



Q.27. 'उत्तरभारतातील नाथपंथी योगी आणि दक्षिण भारतातील भक्तिचळवळ यांना जोडणारा दुवा म्हणजे संत नामदेव होय' असा विचार श्री. रं.कुलकर्णी यांनी कोणत्या ग्रंथात मांडला आहे ?

(A) आरे मराठा

(B) ओवी ते लावणी

(C) प्राचीन मराठी साहित्य-प्रेरणा आणि परंपरा

(D) सेतू

उत्तर = प्रश्न किंवा पर्याय चुक आहे



Q.28. ताराबाई शिंदे यांचा 'स्त्रीपुरुष तुलना' हा ग्रंथ कोणत्या समाजस्तरांमधील स्त्रियांच्या दुर्दशेसंबंधी लिहिलेला आहे ?

(A) सर्व समाजस्तरांमधील

(B) उच्चवर्णीय

(C) दलित

(D) गोरगरीब



Q.29. 'दोन शब्दांत दोन संस्कृती' या लेखात वि.दा. सावरकर यांनी एका संस्कृतीचे वर्णन 'अपटुडेट' या शब्दाने केले आहे, तर दुसऱ्या संस्कृतीसाठी कोणते विशेषण वापरले आहे ?

(A) 'श्रुतिस्मृतिपुराणोक्त'

(B) 'सनातन'

(C) 'ट्रॅडिशनल'

(D) 'वैदिक'



Q.30. 'ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती' या ग्रंथाचे लेखक कोण ?

(A) काशीनाथ नारायण मराठे

(B) लोकहितवादी

(C) हरी केशवजी

(D) गणेशशास्त्री लेले



Q.31. धर्मासंबंधी विचार करताना श्रद्धेला अजिबात फाटा देऊन, निव्वळ तार्किक बुद्धीवरच सर्व भिस्त ठेवल्याबद्दल न्यायमूर्ती रानडे यांनी कोणावर टीका केली ?

(A) गो. ग. आगरकर

(B) लोकहितवादी

(C) म. जोतीराव फुले

(D) विठ्ठल रामजी शिंदे



Q.32. 'नुसते प्रादेशिक दृष्ट्याच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही मराठी समाजाचे स्थान उत्तरीय व दाक्षिणात्य समाजाच्या मधले आहे" असे मत कोणी मांडले आहे ?

(A) शं. वा. जोशी

(B) ग.ह. खरे

(C) इरावती कर्वे

(D) राहुल सांकृत्यायन



Q.33. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या राज्यात केली ?

(A) पंजाब

(B) महाराष्ट्र

(C) उत्तरप्रदेश

(D) राजस्थान



Q.34. ब्राह्मो समाजाचे प्रवर्तक कोण होते ?

(A) न्यायमूर्ती रानडे

(B) राजा राममोहन रॉय

(C) ईश्वरचंद्र सेन

(D) दयानंद सरस्वती



Q.35. जेथे जवळकर यांच्यावर कोणत्या समाजाच्या विचारांचा प्रभाव होता ?

(A) प्रार्थनासमाज

(B) आर्यसमाज

(C) परमहंससभा

(D) सत्यशोधक समाज



Q.36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?

(A) इ.स. 1829

(B) इ.स. 1841

(C) इ.स. 1857

(D) इ.स. 1948



Q.37. "सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका होत्या, त्यांचे प्रशिक्षण 'अमेरिकन मिशन' मध्ये झाले होते. "

(A) पूर्वार्ध बरोबर

(B) केवळ उत्तरार्ध बरोबर

(C) संपूर्ण विधान बरोबर

(D) संपूर्ण विधान चूक



Q.38. 'मनुष्यनिर्मित पदार्थमय आणि कल्पनामय जग म्हणजे संस्कृती' ही व्याख्या कोणाची आहे ?

(A) इरावती कर्वे

(B) वि.का. राजवाडे

(C) लक्ष्मणशास्त्री जोशी

(D) महादेवशास्त्री जोशी



Q.39. 'सत्यकथा' या मासिकाने प्राधान्याने कोणती समीक्षादृष्टी स्वीकारली होती ?

(A) रूपवादी

(B) मार्क्सवादी

(C) कलावादी

(D) जीवनवादी



Q.40. " आम्हाला हवे आंबेडकरवादी साहित्य, मुखवट्याचे साहित्य नको" ही भूमिका घेणारे नियतकालिक कोणते ?

(A) अस्मितादर्श

(B) समुचित

(C) निकाय

(D) प्रबुद्ध भारत



Q.41. म. फुले यांचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा कोणत्या नियतकालिकात प्रकाशित झाला ?

(A) इंदुप्रकाश

(B) ज्ञानोदय

(C) ज्ञानप्रबोध

(D) सत्यदीपिका



Q.42. म. फुले यांनी सुरू केलेले नियतकालिक कोणते ?

(A) दीनबंधू

(B) सत्यदीपिका

(C) सत्सार

(D) दीनमित्र



Q.43. 'औदुंबर' ही कविता एका विरागी योगी पुरुषाचे प्रतिक आहे, असा अन्वयार्थ कोणी लावला आहे ?

(A) वा. ल. कुलकर्णी

(B) दि.के. बेडेकर

(C) सुधीर रसाळ

(D) व. दि. कुलकर्णी



Q.44. 'वज्रपात' या कादंबरीतून कोणत्या राजवटीचे दर्शन घडते ?

(A) बरिदशाहीचे चित्रण

(B) विजयनगरचे साम्राज्य

(C) विजापूरची आदिलशाही

(D) निजामशाही



Q.45. 'कोसला' या कादंबरीतून कोणत्या प्रकारची जीवनदृष्टी व्यक्त होते ?

(A) उपयुक्ततावादी

(B) व्यवहारवादी

(C) अस्तित्ववादी

(D) आदर्शवादी



Q.46. 'श्यामची आई' मध्ये कोणत्या मूल्य-व्यवस्थेचे चित्रण आलेले आहे ?

(A) सरंजामशाही

(B) पारंपरिक

(C) आधुनिक

(D) संक्रमणशील



Q.47. शेंदूची फुले' या संग्रहातील कविता रविकिरण मंडळातील कवींच्या कवितांचे विडंबन करणारी आहे, तसेच या संग्रहातील कवितांमधून राजकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तीचे विडंबन ही केलेले आहे ?

(A) संपूर्ण विधान बरोबर

(B) संपूर्ण विधान चूक

(C) पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक

(D) केवळ उत्तरार्ध चूक



Q.48. 'द मॉर्फालॉजी ऑफ फोकटेल' हा ग्रंथ कोणाचा आहे ?

(A) ब्लादिमिर प्रॉप

(B) स्टीथ थॉमसन्

(C) इ.बी. टायलर

(D) अँड्र्यू लँग



Q.49. दुर्गा भागवतांनी लोक साहित्यातील अवशेषांना 'सजिवावेष' असे संबोधले, पण ही अवशेषाची संकल्पना मुळात कोणत्या ग्रंथात सर्वप्रथम मांडलेली आढळते ?

(A) 'प्रिमिटिव्ह कल्चर' -- ए. बी. टायलर 

(B) लिजेंडस इन दी महाराष्ट्र -- एस. ए. डांगे

(C) फोकलोअर अँन्ड फोककल्चर – रीचर्ड डॉरसन

(D) द गोल्डन बॉऊ- जेम्स फ्रेजर



Q.50. लोक साहित्याभ्यासातील 'कार्यान्वयी' या अभ्यासपद्धतीचा खरा प्रणेता कोण ?

(A) लेवी स्ट्रास

(B) बॅनिस्लो मॅलिनॉस्की

(C) विल्यम बॅस्कम

(D) कार्ल गुस्ताव युंग 



Q.51. संस्कृतीच्या संदर्भात 'ग्रेट ट्रेडिशन' आणि 'लिटल ट्रेडिशन' ह्या संकल्पना कोणी मांडल्या आहेत ?

(A) लुईस आर.एच.

(B) मारीया लीच

(C) कार्ल गुस्ताव युग

(D) रॉबर्ट रेडफिल्ड



Q.52. ग्रंथ आणि त्यांचे ग्रंथकार यांच्या योग्य जोड्या लावा 

ग्रंथ

(1) अपौरुषेय वाङ्मय

(2) महाराष्ट्राची चार दैवते

(3) लोकनाट्याची परंपरा

(4) आमचा गाव बदलापूर

ग्रंथकार

(5) ग.ह. खरे

(6) ना.गो. चाफेकर

(7) श्री. व्यं. केतकर

(8) कमलाबाई देशपांडे

(9) वि.कृ. जोशी

पर्याय :

(A) (1)--(7), (2)--(6), (3)--(8), (4)--(5)

(B) (1)--(5), (2)--(7), (3)--(6), (4)--(8)

(C) (1)--(8), (2)--(5), (3)--(9), (4)--(6)

(D) (1)--9), (2)--(8), (3)--(5), (4)--(7)



Q.53. 'प्रभव' निर्माण करणाऱ्या घटकांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश करता येणार नाही ?

(A) वस्तुबीजे (Themes)

(B) मिथके (Myths)

(C) विशिष्ट आदिम स्थिरपद कल्पना (Archetypes)

(D) शब्दकळा (Diction)



Q.54. प्रभाव आणि अनुकरण यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

(A) प्रभाव आणि अनुकरण या परस्परविरुद्ध प्रक्रिया आहेत

(B) अनुकरण ही प्रभावांतर्गत प्रथमावस्था आहे

(C) प्रभाव आणि अनुकरण यांमध्ये स्तरभेद आहे

(D) अनुकरण हे प्रभावाचे साधन आहे



Q.55. 'अ' चा 'ब' वर प्रभाव पडलेला असेल आणि 'ब' चा 'क' वर प्रभाव पडलेला असेल, तर 'अ’ आणि 'क' यांच्यामध्ये कोणता संबंध असतो ?

(A) अप्रत्यक्ष प्रभाव

(B) संकुल प्रभाव

(C) प्रतिद्वंद्वी प्रभाव

(D) वैचारिक प्रभाव



Q.56. फादर स्टीफन्स यांच्या 'ख्रिस्तपुराणा 'वर भारतीय पुराणांच्या आकृतिबंधाचा असलेला प्रभाव पुढीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे ?

(A) नावीन्याचे आकर्षण

(B) धर्ममताच्या प्रसाराचे प्रयोजन

(C) विश्वव्यापी चळवळी व घटना

(D) स्थलांतर



Q.57. सर्जनशीलतेचा आदर्श म्हणून अन्यभाषिकांनी स्वीकृत केल्यामुळे पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकाचा प्रभाव भारतीय साहित्यात आढळतो ?

(A) बा.सी. मर्ढेकर

(B) भालचंद्र नेमाडे

(C) विजय तेंडूलकर 

(D) जी. ए. कुलकर्णी



Q.58. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अग्रलेखांची शैली–वैज्ञानिक समीक्षा कोणी केली आहे ?

(A) दिलीप धोंडगे

(B) रमेश धोंगडे

(C) अशोक केळकर

(D) प्र. ना. परांजपे



Q.59. 'गायनोक्रिटीक' ही पारिभाषिक संज्ञा स्त्रीवादी समीक्षकांसाठी कोणी योजली आहे ?

(A) सिमॉन द बोन्हा

(B) एलेन शोवॉल्टर

(C) व्हर्जिनिया वुल्फ

(D) केट मिलेट



Q.60. पुढीलपैकी कोणी स्त्रीवादी समीक्षा लिहिलेली नाही ?

(A) प्रभा गणोरकर

(B) शोभा नाईक

(C) नीलिमा गुंडी

(D) सुधा जोशी



Q.61. मनोहर शहाणे यांच्या कादंब-यांची शैलीवैज्ञानिक समीक्षा कोणी केली आहे ?

(A) रमेश धोंगडे

(B) वा. के. लेले 

(C) दिलीप धोंडगे

(D) अशोक केळकर



Q.62. साहित्यातील संप्रदायांचे विवेचन पुढीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये केले आहे ?

(A) पाच भक्तिसंप्रदाय

(B) टीका आणि टिप्पणी

(C) मराठी टीकाकार

(D) टीकाविवेक



Q.63. 'आई रिटायर होते' या नाटकाचे लेखक कोण आहेत ?

(A) वसंत कानेटकर

(B) प्रशांत दळवी

(C) सुरेश खरे

(D) अशोक पाटोळे



Q.64. भारतीय संदर्भातून स्त्रीवाद व स्त्रीवादी समीक्षा' अशी मांडणी ग्रंथरूपाने कोणी केली आहे ?

(A) शोभा नाईक

(B) कुमुद पावडे

(C) कुमुद पोरे

(D) सौदामिनी राव



Q.65. 'स्त्रीगणेशा' हे कोणाच्या कवितासंग्रहाचे शीर्षक आहे ?

(A) प्रज्ञा लोखंडे

(B) वसुधा सरदार

(C) नीरजा

(D) नीलम माणगावे



Q.66. समाजवादी स्त्रीवादाची मांडणी मराठीमध्ये कोणी केली आहे ?

(A) विनया खडपेकर

(B) शांता गोखले

(C) छाया दातार

(D) शांता रानडे



Q.67. 'सेक्शुअल पॉलिटिक्स' या ग्रंथाची लेखिका कोण आहे ?

(A) एलेन शोवॉल्टर

(B) व्हर्जिनिया वुल्फ

(C) केट मिलेट

(D) नाओमी वूल्फ



Q.68. वासुदेव मुलाटे यांच्या विषवृक्षाच्या मुळ्या या कादंबरीत पुढीलपैकी कोणत्या विषयाचे चित्रण आले आहे ?

(A) सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार

(B) वनखात्यातील विविध प्रश्न

(C) झोपडपट्टीतील जीवनवास्तव

(D) महानगरांतील सफाई कामगारांचे जीवनवास्तव



Q.69. शहरात ग्रामीण माणसाची घुसमट होते, कारण शहरी वातावरणात जीवनपोषक सत्त्वे नाहीत, ही भूमिका अधोरेखित करणारी गो. नी. दांडेकरांची कादंबरी कोणती ?

(A) शितू

(B) पवनाकाठचा धोंडी

(C) जैत रे जैत

(D) माचीवरचा बुधा



Q.70. 'मरणकळा' आणि 'अंगारमाती' या कथा-संग्रहातील कथांतून प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या विषयाचे चित्रण आले आहे ?

(A) वीटकामगारांचे जीवनवास्तव

(B) महानगरांतील सफाई कामगारांचे जीवनवास्तव

(C) शेतकरी आणि शेतीव्यवसायाचे वास्तव

(D) सुशिक्षित बेकारांचे जीवनवास्तव



Q.71. 'वानगी' या कथासंग्रहाचे लेखक कोण ? 

(A) व्यंकटेश माडगूळकर

(B) श्री. म. माटे

(C) ग.ल. ठोकळ

(D) उद्धव शेळके



Q.72. 'हिरवे स्वप्न' हा कथासंग्रह कोणाचा आहे ?

(A) र.वा. दिघे

(B) भास्कर चंदनशिव

(C) प्रतिमा इंगोले

(D) व्यंकटेश माडगूळकर



Q.73. खालीलपैकी कोणती साहित्यकृती प्रा. कुमुद पावडे यांची आहे ?

(A) रक्ताळलेली लक्तर

(B) आहुती

(C) अंत:स्फोट

(D) मी एक अस्पृश्य



Q.74. पुढीलपैकी कोणत्या आत्मकथनात्मक लेखनात लातूर-उस्मानाबाद परिसरातील मराठवाडी बोलीचे दर्शन घडते ?

(A) मु.पो. देवाचे गोठणे

(B) फांजर

(C) आठवणींचे पक्षी

(D) अक्करमाशी



Q.75. "तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत" या ओळी कोणत्या कवीच्या आहेत ?

(A) नामदेव ढसाळ

(B) दया पवार

(C) ज. वि. पवार

(D) प्रज्ञा लोखंडे



Post a Comment

Previous Post Next Post