Q.1. वागिंद्रियाव्दारे निर्माण झालेले व भाषेत वापरलेले ध्वनी म्हणजे काय ?
(A) पद
(B) रूपिका
(C) स्वन
(D) रूपिम
Q.2. भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ?
(A) आचार्य अत्रे
माधवराव पटवर्धन
(C) का. र. मित्र
(D) पु. भा. भावे
Q.3. भाषिक संज्ञापन प्रक्रियेतील पुढील घटकांचा योग्य क्रम लावा :
(1) संकेतीकरण
(2) आशय
(3) ध्वनिग्रहण
(4) ध्वनिनिर्मिती
(5) विसंकेतीकरण
(A) (2), (1), (4), (3), (5)
(B) (1), (2), (3), (4), (5)
(C) (2), (4), (1), (3), (5)
(D) (1), (3), (5), (4), (2)
Q.4. भाषिक संज्ञापनातील पुढीलपैकी कोणते घटक कमी महत्त्वाचे आहेत ?
(A) मानवी मुखातील अवयव
(B) स्वनरचनांची निर्मिती
(C) स्वनांचा हवेतून होणारा संचार
(D) परिसरातील गोंगाट
Q.5. पुढीलपैकी कोणती मराठीची बोली नाही ?
(A) अहिराणी
(B) वऱ्हाडी
(C) माळवी
(D) हळवी
Q.6. 'कडबू' हा शब्द मराठीने पुढीलपैकी कोणत्या भाषेतून स्वीकारला आहे ?
(A) कन्नड
(B) बंगाली
(C) तेलगू
(D) गुजराती
Q.7. 'मानवी वागिंद्रियाद्वारे स्वनांची निर्मिती कशी होते' याचा विचार पुढीलपैकी कोणत्या अभ्यासशाखेत होतो ?
(A) श्रव्य स्वनविज्ञान
(B) औच्चरिक स्वनविज्ञान
(C) व्याकरण
(D) सांचारिक स्वनविज्ञान
Q.8.मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ?
(A) ग्रीम
(B) ग्रिअर्सन
(C) चॉम्स्की
(D) हॉकेट
Q.9. 'स्वनिम', 'स्वनिकांतर', 'रुपिम', यासारखे पारिभाषिक शब्द फक्त प्रमाणभाषेत वापरले जातात; बोली भाषेच्या संदर्भात वापरले जात नाही.
हे विधान ……………………..
(A) बरोबर आहे
(B) चुकीचे आहे
(C) पूर्वार्ध बरोबर आहे
(D) उत्तरार्ध बरोबर आहे
Q.10. भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ?,
(A) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती
(B) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती
(C) समकालिक भाषाविज्ञान पद्धती
(D) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती
Q.11. भाषिक वर्तन ही संकल्पना कोणी मांडली ?
(A) स्किनर
(B) चॉम्स्की
(C) ग्रिअर्सन
(D) सोस्यूर
Q.12. मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ?
(A) सिनो-तिबेटियन
(B) ऑस्ट्रो-आशियायी
(C) द्राविडी
(D) इंडो-युरोपियन
Q.13. ‘॥ वाछि तो विजेया होईवा - ॥' असा उल्लेख :
(A) दिवे आगरातील शके 982 मधील ताम्रपटावर आढळतो
(B) दक्षिण सोलापूरातील कुडल येथे शके 940 मधील संगमेश्वर मंदिरातील सभामण्डपाच्या तुळईवर कोरलेला आहे
(C) अक्षी येथील शके 934 मधील संस्कृत मिश्रित मराठीच्या पहिल्या शिलालेखात आढळतो
(D) पंढरपूर येथील शके 1195 मधील मराठीच्या पहिल्या शिलालेखात आढळतो
Q.14. महानुभाव संप्रदायाचा उदय महाराष्ट्रात झाला पण त्याचा प्रसार आणि प्रचार काबूल कंदाहरापर्यंत झालेला होता :
(A) पूर्वार्ध बरोबर
(B) उत्तरार्ध बरोबर
(C) संपूर्ण विधान चूक
(D) संपूर्ण विधान बरोबर
Q.15. 'स्यानपोथी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
(A) बाईदेव बास
(B) महदंबा
(C) म्हाइंभट
(D) मुक्ताबाई
Q.16. 'जन्म गेला उष्टे खाता । लाज न ये तुमच्या चित्ता' हा आक्रोश कोणाचा ?
(A) सेना न्हावी
(B) चोखामेळा
(C) गोरा कुंभार
(D) कर्ममेळा
Q.17. 'पोटासाठी जरी करी हरिकथा। जन रंजविता फिरतसे॥ तेणे घात केला एकोत्तरशतकुळांचा ।'
पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर ॥' ही रचना पुढीलपैकी कोणत्या संताची आहे ?
(A) संत तुकाराम
(B) संत नामदेव
(C) संत चोखामेळा
(D) संत कर्ममेळा
Q.18. मराठी आख्यानकाव्याचे उद्गाते असे कोणास संबोधले जाते ?
(A) संत नामदेव
(B) महदंबा
(C) संत एकनाथ
(D) वरीलपैकी कोणतेही नाही
Q.19. 'महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
(A) वि. का. राजवाडे
(B) व. दि. कुलकर्णी
(C) वि. ल. भावे
(D) श्रीधर व्यंकटेश केतकर
Q.20. भाऊसाहेब, गोविंदपंत बुंदेले, बळवंतराव मेहंदळे, जनकोजी शिंदे, समसेरबहादूर, इब्राहिमखान, विश्वासराव या सर्वांचा निर्देश असणारा पानपतावरील अतिशय विश्वसनीय पोवाडा कोणत्या शाहिराचा आहे ?
(A) अनंत फंदी
(B) रामा सटवा
(C) प्रभाकर
(D) सगनभाऊ
Q.21. 'पोवाडा हे केवळ श्राव्य नव्हे; ते दृश्यकाव्यही आहे. पोवाडा हे एकप्रकारचे नाटक आहे. त्यात अनेक पात्रे असतात. मुख्यत शाहीर व त्याचा साथीदार हे दोघे पोवाड्यातील व्यक्तींच्या सोंगाची बतावणी करतात.' असे पोवाड्यासंबंधी विवेचन कोणी केले आहे ?
(A) य. न. केळकर
(B) शाळिग्राम
(C) श्री. व्य. केतकर
(D) वि. का. राजवाडे
Q.22. 'वैखरी भाषा आणि भाषाव्यवहार' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
(A) न. चिं. केळकर
(B) अशोक केळकर
(C) रमेश धोंगडे
(D) य. न. केळकर
Q.23. 'बळीबा पाटील' या कादंबरीचे लेखक कोण ?
(A) बापूजी हरी शिंदे
(B) कृष्णराव भालेकर
(C) गणपतराव पाटील
(D) तुकाराम तात्या पडवळ
Q.24. चारुता सागर या टोपणनावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे मूळ नांव सांगा.
(A) मा. ना. पाटील
(B) म. भा. भोसले
(C) दिनकर दत्तात्रय भोसले
(D) रामचंद्र बाबर
Q.25. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना 'बालकवी' ही उपाधी कोणी दिली ?
(A) राम गणेश गडकरी
(B) ना. वा. टिळक
(C) का. र. कीर्तिकर
(D) कवी चंद्रशेखर
Q.26. 'विकारविलसित' ही साहित्यकृती कोणत्या नाटकाचा अनुवाद आहे ?
(A) हॅम्लेट
(B) मॅक्बेथ
(C) अॅज यू लाइक इट
(D) टेम्पेस्ट
Q.27. पुढील ग्रंथ आणि त्यांचे अनुवादक यांच्या जोड्या लावा :
ग्रंथ
(1) गॉन विथ द विंड
(2) द अल्केमिस्ट
(3) पिएर अँड जॉन
(4) उमरावजान
अनुवादक
(5) प्रलहाद वडेर
(6) विजय पाडळकर
(7) नितिन कोत्तापल्ले
(8) वर्षा गजेंद्रगडकर
(9) अपर्णा वेलणकर
पर्याय :
(A) (1)–(6), (2)–(8), (3)–(7), (4)–(9)
(B) (1)–(9), (2)–(5), (3)–8), (4)–(7)
(C) (1)–(7), (2)–(6), (3)–(9), (4)–(5)
(D) (1)–8), (2)–(7), (3)–(5), (4)–(6)
Q.28. मराठीतील कोणत्या प्रकाशनसंस्थेने अनुवाद हेच आपले प्रमुख कार्यक्षेत्र म्हणून अलीकडे निश्चित केले आहे ?
(A) पद्मगंधा प्रकाशन
(B) मौज
(C) मेहता पब्लिशिंग हाऊस
(D) प्रतिमा प्रकाशन
Q.29. मंगेश पाडगावकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकांचे मूळाबरहुकूम अनुवाद केले आहेत ?
(A) द टेंपेस्ट, ज्युलियस सीझर आणि रोमिओ अँड जूलिएट
(B) हॅम्लेट, किंग लिअर आणि मॅकबेथ
(C) मिड्समर नाईट्स ड्रीम, ऑथेल्लो आणि द टेंपेस्ट
(D) मर्चंट ऑफ व्हेनिस, रोमिओ अँड जूलिएट आणि द टेंपेस्ट
Q.30. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने पुढीलपैकी कोणता अनुवाद प्रकाशित केलेला नाही ?
(A) होमरचे 'ईलियड' हे महाकाव्य
(B) टॉलस्टॉयची 'वार अँड पीस' ही कादंबरी
(C) न्या. रानडे लिखित 'राइज ऑफ द मराठा 'पॉवर'
(D) स्टीफन हॉकिन्स यांचा 'हिस्टरी ऑफ टाइम' हा ग्रंथ
Q.31. 'असंलक्ष्यक्रम ध्वनी' कोठे प्रत्ययास येतो ?
(A) वाद्यांच्या गजरामध्ये
(B) काव्यास्वादात
(C) कलास्वादात
(D) संगीताच्या मैफिलीत
Q.32. सर्व गुणांचा समतोल समावेश असलेली, वामनाने प्रशंसिलेली रीती कोणती ?
(A) गौडी
(B) आरभटी
(C) वैदर्भी
(D) कौशिकी
Q.33. ध्वनीचे दोन प्रकार कोणते ?
(A) सहजगम्य ध्वनी आणि गूढार्थध्वनी
(B) काव्यगत ध्वनी आणि व्यवहारांतर्गत ध्वनी
(C) तीव्र आणि सौम्य ध्वनी
(D) लौकिक आणि अलौकिक ध्वनी
Q.34. अभिधाव्यापारासाठी आवश्यक असलेला 'संकेत' कशामुळे सिद्ध होतो ? असे वैय्याकरणी मानतात.
(A) जाती, गुण, द्रव्य आणि क्रिया या सर्वांमुळे
(B) फक्त जाती या एकाच घटकामुळे
(C) अपोहामुळे
(D) केवळ व्यक्तीमुळे
Q.35. व्यंजना ही शब्दशक्ती कोठे कार्यरत होते असा मम्मटाचा आग्रह आहे :
(A) सर्व संभाषण व्यवहारात
(B) सर्व कलांच्या आविष्कारात
(C) फक्त काव्यात
(D) काही विशिष्ट कलांमध्ये
Q.36. ‘पुरुषार्थ' या शब्दातील 'पुरुष' या पदाचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीमुळे निश्चित होतो ?
(A) लक्षणा
(B) अभिधा
(C) व्यंजना
(D) तात्पर्य
Q.37. साहित्याच्या मूळतत्त्वांची चर्चा कोणत्या प्रकारच्या समीक्षेत आढळते ?
(A) विरचनावादी
(B) संरचनावादी
(C) उपयोजित
(D) सैद्धान्तिक
Q.38. ललित साहित्याच्या भाषेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे ?
(A) प्रासादिकता
(B) माधुर्य
(C) अनेकार्थसूचकता
(D) बोली
Q.39. 'साहित्याची भाषा' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
(A) भालचंद्र नेमाडे
(B) रंगनाथ पठारे
(C) वसंत आबाजी डहाके
(D) गो. मा. पवार
Q.40. समीक्षकाचे व्यवच्छेदक लक्षण कोणते आहे ?
(A) उत्स्फूर्तता
(B) विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी
(C) चिकित्सक दृष्टी
(D) अलिप्तता
Q.41. 'हेतुशून्य हेतुपूर्णता' या संकल्पनेचा प्रणेता कोण आहे ?
(A) क्रोचे
(B) लाँजायनस
(C) कांट
(D) डेरिदा
42. 'पासंग' हा समीक्षात्मक लेखसंग्रह पुढीलपैकी कोणी लिहिला आहे ?
(A) वा. ल. कुलकर्णी
(B) व. दि. कुलकर्णी
(C) कुसुमावती देशपांडे
(D) गो. म. कुलकर्णी
Q.43. आ, ई, ऊ हे स्वर कोणत्या प्रकारचे आहेत ?
(A) हस्व
(B) दीर्घ
(C) संयुक्त
(D) अर्धस्वर
Q.44. व्याकरणात भाषेचा कशाप्रकारे अभ्यास केलेला असतो ?
(A) सामाजिक
(B) मानसशास्त्रीय
(C) शास्त्रीय
(D) मजेशीर
Q.45. 'मुलगा क्रिकेट खेळतो' या वाक्यात कोणता प्रयोग आहे ?
(A) कर्तरी
(B) कर्मणी
(C) भावे
(D) संकीर्ण
Q.46. पहाड, हापूस व दफ्तर हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत ?
(A) तत्सम
(B) परभाषीय
(C) तदभव
(D) देशी
Q.47. पुढील शब्दांपैकी कोणता एक नामधातू नाही ?
(A) खर्चणे
(B) पंक्चरणे
(C) बांधणे
(D) बदलणे
Q.48. वृत्तान्तलेखनात पुढीलपैकी कशास सर्वाधिक महत्त्व असते ?
(A) यथातथ्यता
(B) भावपूर्णता
(C) तार्किकता
(D) आत्मनिष्ठा
Q.49. वरिष्ठांना औपचारिक स्वरूपाचे पत्र लिहायचे असल्यास पुढीलपैकी कोणता मायना वापराल ?
(A) प्रिय
(B) सप्रेम नमस्कार
(C) साष्टांग नमस्कार
(D) आदरणीय महोदय
Q.50. जाहिरातींच्या भाषेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे ?
(A) दुर्बोधता
(B) पृथगात्मता
(C) आवाहकता
(D) संपृक्तता
.jpg)